तिवसा : येथील पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जमाती महिलाकरिता राखीव आहे. परंतु या प्रवर्गात एकही सदस्य नसल्याने निवडणूक आयोगाचे आदेशानुसार अनुसूचित जाती महिला व नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिला यांच्या नावाने ईश्वरचिठ्ठी ४ डिसेंबरला काढल्या जाणार आहे. तिवसा पंचायत समितीमध्ये तिवसा, वरखेड, कुऱ्हा, वऱ्हा, मार्डी व मोझरी असे सहा गण आहेत. यापैकी एकाही गणामध्ये अनुसूचित जमाती महिला राखीव सदस्य नाहीत. त्यामुळे सभापतीपद रिक्त राहू नये यासाठी निवडणूक आयोगाचे आदेशानुसार वरखेड गणाच्या सदस्या अर्चना विरूळकर व मार्डा गणाच्या सदस्य उज्ज्वला अनूप पांडव या दोन्ही सदस्यांमध्ये ४ डिसेंबरला सकाळी ११ वाजता पंचायत समिती सभागृहात पिठासीन अधिकारी विजय लोखंडे यांच्या उपस्थितीत ईश्वरचिठ्ठी काढली जाईल. यापैकी ज्यांच्या नावाने चिठ्ठी निघेल त्या सदस्य बिनविरोध तिवसा पंचायत समितीचे सभापती होतील. नागरिकांचे या दोन गणापैकी भाग्याचा कौल कुणाला याकडे लक्ष लागले आहे.
ईश्वरचिठ्ठीने ४ डिसेंबरला ठरणार सभापती
By admin | Published: December 01, 2014 10:46 PM