पांढुर्णा चौकात आंदोलन, मोकाट जनावरे, अतिक्रमण, घाणीवर कारवाई केव्हा?
वरूड : शहरातील नागरी समस्यांमुळे निर्माण झालेल्या परिस्थिती निवारणासाठी युवक काँग्रेसच्यावतीने पांढुर्णा चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
शहरात प्रभाग १, ५ व ८ मधे नव्याने तयार झालेल्या नागरी वस्त्यांमधे रस्ता, नाली, पथदिवे या सुविधा नाहीत. केदार चौकाचा दैनंदिन बाजार बंद असल्याने महात्मा फुले यांच्या पुतळ्याभोवती घानीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पार्डी चौकसुद्धा अतिक्रमित झाला असून याबाबत पोलीस प्रशासनाने नगरपालिकेला अवगत केले आहे. या समस्यांसाठी काँग्रेसचे चक्काजाम आंदोलन केले. याप्रसंगी मुख्याधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळ गाठून सात दिवसांत मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. मोकाट जनावरांच्या बंदोबस्ताकरिता दोन दिवसांत कारवाई करणार असल्याचे सांगितले.
युवक काँग्रेस शहर अध्यक्ष बंटी रडके, महिला काँग्रेस शहर अध्यक्ष सविता काळे, सेवादल महिला अध्यक्ष रंजना मस्की, महिला तालुका उपाध्यक्ष शैलजा वानखडे, माजी नगरसेवक बाबा गडलिंग, पुंडलिक बासुंदे, बाजार समिती संचालक दीपक देशमुख, सोहेल खान, हेमंत कोल्हे, राहुल गावंडे, रोशन आजनकर, रोहित अंबाडकर, सनी शिरभाते, अंकुश राऊत, विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष मनोज इंगोले, शैलेश ठाकरे, वैभव पोतदार, वसंत निकम, सतीश धोटे, कार्तिक चौधरी, आशु हरले, गोलु पेठे, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष मकसूद पठाण, नेपाल पाटील, बबलू शेख, अजहर काजी, गजानन पडोळे, आशिष शिरभाते, राम निंभोरकर, गुड्डू अटाळकर, जयेश तरूडकर, हर्षल कुकडे, शकील शाह, शोएब पठाण, स्वप्निल सावंत, आकाश मानकर, विकास ठाकरे, चेतन देवते, भूषण काळे, ललिता मतलणी आदी उपस्थित होते.