शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

आव्हान ओडीएफ अन् मालमत्ता करवसुलीचे !

By admin | Published: February 25, 2017 12:08 AM

२७ जानेवारीपासून सुरू झालेली निवडणूक प्रक्रिया गुरुवारच्या मतमोजणीने संपुष्टात आली.

महापालिका : तिजोरी रितीच, ३५०० स्वच्छतागृह उभारणीचे लक्ष्यअमरावती : २७ जानेवारीपासून सुरू झालेली निवडणूक प्रक्रिया गुरुवारच्या मतमोजणीने संपुष्टात आली. गेली महिनाभर महापालिकेची संपूर्ण यंत्रणा निवडणूक प्रक्रियेत व्यस्त होती. त्याचा परिणाम प्रशासकीय कामाकाजावर झाला. हा ताण उतरला असताना यंत्रणेसमोर करवसुली आणि शहर हागणदारीमुक्तीचे आव्हान आहे. अवघा एक महिन्याच्या व कालावधीत महापालिका यंत्रणेला हे लक्ष्य पार करायचे असून आता आयुक्तांना या दोन बाबींकडे मोर्चा वळविला आहे. जुने आर्थिक वर्ष संपायला उणापुरा एक महिना शिल्लक असताना सुमारे १५ कोटींचा मालमत्ता कर वसुलीचे लक्ष्य प्रशासनाकडून ठेवण्यात आले आहे. शहरातील दीड लाख मालमत्ता धारकांकडून महापालिकेला सुमारे ४१ कोटींचा महसूल अपेक्षित आहे. त्याबाबत मालमत्ताधारकांना मागणीपत्र पोहोचविण्यात आले असून पाचही झोनची वसुली सुमारे २२ कोटींच्या घरात पोहोचली आहे. महापालिका निवडणूक निर्विघ्न पार पडली असली तरी त्यासाठी तिजोरीवर ३ ते साडे तीन कोटींचा अतिरिक्त भार पडला. आर्थिक परिस्थिति बेताची असतांना आयुक्त हेमंत पवार यांनी नियोजन केल्याने ही प्रक्रिया कुठल्याही अडथळ्याविना पार पडली. मात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न अद्यापही सुटला नाही. याशिवाय अन्य आघाड्यांवर आर्थिक तंगीमुळे सामसूम आहे. संपूर्ण यंत्रणा निवडणूकीत लागल्याने करवसूलीला ब्रेक लागला व तिजोरी आंकुचन पावली. त्या अनुषंगाने हाती असलेल्या अवघ्या महिन्याभरात वसूलीचे लक्ष्य पार करण्यासाठी आयुक्त, उपायुक्तद्वय आणि कर संकलन अधिकारी महेश देशमुख यांनी लक्ष वळविले आहे. ४१ कोटींची मागणी असताना मार्चअखेर ३५ कोटींची वसुली महापालिकेत अपेक्षित आहे. एकूण १ मार्च ते ३१ पर्यंत कर विभागाला कमीत कमी १३ ते १४ कोटींचा महसूल गोळा करण्याचे आव्हान पेलायचे आहे. मालमत्ता कर आणि नगररचना विभागाकडून येणाऱ्या बांधकाम शुल्कावर महापालिकेचा आर्थिक डोलारा अवलंबून असल्याने हाती असलेल्या महिन्याच्या कालावधीत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वसुलीकडे अधिकाधिक लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या आहेत. त्या अनुषंगाने सोमवारी संबंधित विभागप्रमुखांची बैठक होईल व त्यात महसूलवसुलीसह लक्ष्यांकपूर्तीचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. पाचही प्रशासकीय झोनच्या तुलनेत प्रभाग २,३ व ५ या तीन प्रभागातील मालमत्ता करवसूलीचे प्रमाण १ आणि बडनेरा झोनच्या तुलनेत नेहमीच कमी असते. त्यामुळे २,३ आणि ५ अर्थात भाजीबाजार झोन मधील मालमत्ता कर वसुलीकडे अधिक लक्ष पुरविल्या जाणार आहे. करवसूलीला मागील महिन्याभराच्या कालावधीत बसलेला ‘ब्रेक’ पाहता ती कसर भरून काढण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. (प्रतिनिधी)ओडीएफची लक्ष्यपूर्ती आवाक्याबाहेर ? ३१ मार्च २०१७ पर्यंत महापालिका क्षेत्र हागवणदारीमुक्त करायचे आहे. तशी डेडलाईन नगरविकास विभागाने महापालिकेला दिली आहे. मात्र निवडणूक प्रक्रियेत महिन्याच्या कालावधी गेल्याने वैयक्तिक व सामुदायिक स्वच्छतागृहाचे काम रखडले. त्यामुळे हाती असलेल्या मार्च या एका महिन्यात साडेतीन हजारांपैकी अधिक शौचालयाची उभारणी करुन प्रत्यक्षात जीओ टॅॅगिंग करण्याचे आव्हान यंत्रणेला पेलायचे आहे. विशेष म्हणजे कागदोपत्री शहर हागवणदारीमुक्त केल्यास संबंधित घटक प्रमुखांवर कारवाईचा आसूड ओढला जाणार आहे. त्यामुळे कर संकलनासोबत उर्वरित ३०-३२ दिवसात ‘शहर ओडीएफ’ करण्याचे अशक्यप्राय आव्हान यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे.