लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कल्याणनगर ते यशोदानगर या कामाशी पालकमंत्र्यांचा संबंध नसताना त्यांच्यावर आ. रवि राणा आरोप करीत आहेत. विषय वेगळाच आहे. प्रत्यक्षात राणा हेच बालक अन् खोटारडेदेखील आहेत. त्यांनी रविवारी याच ठिकाणी कागदपत्रांसह उपस्थित राहावे; ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊ द्यावे, असे आव्हान नगरसेवक व स्थायी समितीचे माजी सभापती तुषार भारतीय यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिले.कल्याणनगरच्या कामाचा निधी माझ्या नावाने आलेला आहे. याबाबत ७ मार्च २०१८ चे अवर सचिवांचे आणि जिल्हाधिकाऱ्यांचे २३ मार्चचे पत्र आहे. कामाला प्रशासकीय मान्यतेचे कार्यकारी अभियंत्यांचे पत्र आहे. महापालिकेऐवजी बांधकाम विभागाला एजन्सी द्यावी, असे रवि राणांचे १६ मार्चचे पत्र आहे. त्या ३९ कामांमध्ये कुठेही कल्याणनगर ते यशोदानगर या कामाचा उल्लेख नाही. बांधकाम विभागाद्वारे १९ कामांमध्ये हे काम क्लब केले आहे. याबाबत १३ मार्चचेदेखील पत्र आहे. या कल्याणनगर ते यशोदानगरच्या कामाशी रवि राणांचा कुठेही संबंध नाही. दिशाभूल करणे त्यांना शोभत नसले तरी त्यांची परंपरा आहे. धमक असल्यास २४ मार्चला श्रमिक पत्रकार संघात सकाळी ११ वाजता कागदपत्रांसह या, असे जाहीर आव्हान तुषार भारतीय यांनी रवि राणांना दिले. मुख्यमंत्र्यांचा शेरा असलेले पत्र हे पर्यटन विभागाच्या निधीसंदर्भात आहे. तेही मूलभूत निधीबाबत आहे. राणांच्या कामांच्या यादीतच ते नाही. ज्याला कागदाचा अर्थ कळत नाही, तोच बालक असल्याचा आरोप भारतीय यांनी केला. त्यांना या कामाचा अधिकारच नाही. त्यांची कामे ही जनतेच्या नव्हे, कंत्राटदारांच्या सोयीनुसार आहेत. निधी हा शासनाचा असला तरी त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेत कुठेही पालकमंत्र्यांचा उल्लेख नाही. माझ्या नावाने काम असल्यानेच आपण पालकमंत्र्यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन केले, तेही पोलीस विभागाची ना हरकत घेऊन, असे तुषार भारतीय यांनी सांगितले. पत्रपरिषदेला उपमहापौर संध्या टिकले, सुरेखा लुंगारे, पद्मजा कौंडिण्य, लता देशमुख, भारत चिखलकर, सविता भागवत, श्याम जोशी उपस्थित होते.राणांना एवढा माज कशाचा?माझ्या प्रभागात सात जणांचा डेंग्यूने मृत्यू झाल्याचा कांगावा राणा करीत आहेत. त्यांना माझे आव्हान आहे की, त्यांनी या सात जणांची नावे सांगावी अन् त्यांच्या मृत्यूचे प्रमाणपत्र द्यावे. मरणाचेही राजकारण करण्याएवढ्या पातळीवर राणा घसरले आहेत. शहरात डेंग्यूचा कहर असताना राणा मात्र दहीहंडी अन् त्यामध्ये बायांच्या ठुमक्यात व्यस्त होते. सवंग राजकारणामुळे वातावरण गढूळ झाले असल्याचे भारतीय म्हणाले.नवरा-बायकोचा पक्षस्वाभिमान ही काही दिवसांनंतर फक्त नवरा-बायकोचीच पार्टी राहणार आहे. कार्यकर्त्यांना स्वाभिमान असल्यास त्यांनी आमच्या पक्षात यावे; आमची कवाडे खुली आहेत, असे भारतीय म्हणाले. कामासंदर्भातील अवर सचिवांचे एक जरी पत्र दाखविल्यास मी राजकारण सोडेन किंवा त्यांनी सोडावे. कल्याणनगरचा रस्ता विनापरवानगी जेसीबीने खोदला. यासंदर्भात आयुक्तान्ांी पोलिसांत तक्रार न दिल्यास आम्ही देऊ, असे तुषार भारतीय म्हणाले.
रवि राणांना आव्हान, रविवारी सामना करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 10:15 PM
कल्याणनगर ते यशोदानगर या कामाशी पालकमंत्र्यांचा संबंध नसताना त्यांच्यावर आ. रवि राणा आरोप करीत आहेत. विषय वेगळाच आहे. प्रत्यक्षात राणा हेच बालक अन् खोटारडेदेखील आहेत.
ठळक मुद्देतुषार भारतीय : सोमवारी राणांच्या घरासमोर लावणार बेशरमचे झाड