रात्रीला होते वाहतूक : आरटीओ, पोलीस, महसूल विभाग ‘ढिम्म’अमरावती : नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदीपात्रातून अमरावतीत नियमबाह्य होणारी वाळू तस्करी रोखणे महसूल विभागाला आव्हान ठरत आहे. वाळू तस्कर रात्रीच्यावेळी वाहतूक करीत असल्याने क्षमतेपेक्षा जास्त वाळू आणली जात आहे.कन्हान वाळू तस्करीचे धागेदोरे खोलवर रूजल्याने महसूल विभाग वाळू तस्करी रोखण्यात अयशस्वी ठरला आहे. दोन ब्रास रॉयल्टी जमा करून चक्क १२ ब्रास वाळू वाहतूक केली जात आहे. कन्हान वाळू वाहतुकीसाठी अमरावती येथून दरदिवसाला ३५ ते ४० ट्रक धावतात. १२ चाकांचे हे ट्रक दोन ब्रास वाळू वाहतुकीच्या नावे १० ते १२ ब्रास वाळू आणत असल्याचे वास्तव आहे.शासनाच्या तिजोरीला फटकाअमरावती : कन्हान वाळू वाहतुकीतून शासन तिजोरीला मोठा फटका बसत आहे. क्षमतेक्षा जास्त वाळू वाहतूक करता येत नसताना ती शहरात कशी आणली जाते, हा संशोधनाचा विषय आहे. १५ दिवसांपूर्वी कन्हान वाळू तस्करीकडे ‘लोकमत’ने लक्ष वेधले. दोन, चार दिवस कन्हान वाळू तस्करी थांबली. आता पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती आहे. खरे तर गौण खनिजाची तस्करी रोखण्याची जबाबदारी महसूल विभागाची आहे. मात्र, अलीकडे महसूल विभाग फारच सुस्तावला असून वाळू तस्करांना रान मोकळे झाले आहे.वाळू साठे कुणाचे?शहराच्या बऱ्याच भागात कन्हान वाळू साठवून ठेवण्यात आली आहे. मात्र हे वाळूसाठे महसूल विभागाला दिसू नयेत, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. वाळू साठवून ठेवता येत नसताना शहरात अनेक ठिकाणी कन्हान वाळू साठे दिसून येतात. महसूल विभाग हे वाळूसाठे का जप्त करीत नाही, असा सवाल आहे.नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात दोन वाहने ताब्यात घेण्यात आली. कन्हाळ वाळू तस्करी रोखण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. रात्रीच्यावेळी गस्तदेखील वाढविली जाईल. - गजेंद्र मालठाणेतहसीलदार, अमरावती.
‘महसूल’पुढे कन्हान वाळूची तस्करी रोखण्याचे आव्हान
By admin | Published: April 17, 2017 12:05 AM