शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
2
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
3
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
4
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
5
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
6
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
7
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
8
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
9
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
10
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
12
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
13
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
14
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
15
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
16
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
17
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
18
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
19
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ

विदर्भात वनवणवा रोखणे ‘चॅलेंजिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 4:49 PM

यंदा विदर्भातील जंगलात फेब्रुवारी, मार्चपासून आग लागण्याचा घटना घडत आहेत. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आजही वनविभागाकडे अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा अभाव आहे

गणेश वासनिक  अमरावती : यंदा विदर्भातील जंगलात फेब्रुवारी, मार्चपासून आग लागण्याचा घटना घडत आहेत. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आजही वनविभागाकडे अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा अभाव आहे. त्यामुळे यंदा विदर्भातील वनवणवा रोखणे वनविभागासाठी ‘चॅलेंजिंग’ ठरणारे आहे.  दुसरीकडे वन्यप्राण्यांना तृष्णा भागविण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.राज्यात प्रादेशिक वनविभाग, व्याघ्र प्रकल्पात लाखोे हेक्टर जमीन आहे. या जमिनीवर वन्यपशू, वनसंपदा अस्तित्वात आहे. मार्च, एप्रिलमध्ये दरवर्षी वणवा पेटून हजारो हेक्टर जमिनीवरील वनसंपदा नष्ट होतात. वन्यपशू आगीच्या भक्ष्यस्थानी सापडतात. गतवर्षी ७० हजार हेक्टर जंगलवनवणव्याने व्यापल्याची नोंद वनविभागात झाली आहे. वनविभागाचे प्रधान वनसचिव विकास खारगे यांनी फेब्रुवारीत राज्यातील वनाधिका-यांना पत्र पाठवून वणवा रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार वनविभागाने वनवणव्यावर लगाम लावण्यासाठी काही उपयायोजनाही केल्या आहेत. ज्या वनखंडात तेंदूपत्ता संकलनाची कामे सुरू आहेत, त्या जंगलाला आग लागल्यास तेंदूपत्ता संकलन करणाºया कंत्राटदाराचे परवाने रद्द करून दंडात्मक रक्कम वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मोहफूल वेचणाºयांवर लक्ष, शिकाºयांवर पाळत, कुरण विकास आदी उपक्रम सुरू आहे. जंगलांना आग लागू नये, याची खबरदारी वनविभाग घेत असताना अचानक दोन दिवसांपूर्वीच्या अवकाळी पावसाने वनविभागाला काहीसा दिलासा मिळाला आहे. जंगलात वनवणवा हा मार्च ते मे या कालावधीत लागतो. याच महिन्यात जंगलात आग लागू नये, याची खबरदारी घेतली जाते. परंतु यंदा पाऊस अत्यल्प पडल्याने ही बाब वन्यपशुंसाठी उन्हाळ्यात धोकादायक ठरणारी आहे. जंगलातील पाण्याचे स्त्रोत आटल्याने वन्यपशुंना त्यांच्या सुरक्षित क्षेत्रातच पाणी, भक्ष्य मिळविणे कठीण झाले आहे. गतवर्षी विदर्भात गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ व अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे सॅटेलाईट सर्वेक्षणाअंती स्पष्ट झाले होते. यावर्षी चंद्रपूर, यवतमाळ, ताडोबा, मेळघाटच्या सेमाडोह, अमरावती नजीकच्या वडाळी, पोहरा, चांदूर रेल्वे जंगलात आग लागण्याच्या घटना घटल्या आहे. मात्र, अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा अभाव, मनुष्यबळाची वानवा, पाणीटंचाई आदी बाबी उपलब्ध होत नसल्याने आगीवर ंिनयंत्रण मिळविताना वनविभागाला कसरत करावी लागणार आहे.     वनकर्मचाºयांना अलर्ट राहण्याच्या सूचना मार्च महिना सुरू झाला की, जंगलात गवत वाळू लागतात. यावर्षी विदर्भातील जंगलात हीच स्थिती आहे. वन्यजीवांची तृष्णा भागविण्यासाठी व्याघ्र प्रकल्पात कृत्रिम पाणवठे तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. जंगलात आग आणि शिकाºयांवर पाळत ठेवण्यासाठी वनकर्मचाºयांना अलर्ट राहण्याचा सूचना वरिष्ठांनी दिल्या आहेत. आगीवर सॅटेलाईटने लक्षजंगलात मनुष्यनिर्मित अथवा अचानक लागणाºया आगीवर वनविभाग सॅटेलाईटने लक्ष्य ठेवून आहे. डेहरादून येथील वन्यजीव संस्थेच्या माध्यमातून राज्यात वनवणव्यावर सॅटेलाईटने लक्ष्य ठेवले जाणार आहे. फेब्रुवारी, मार्च महिन्यात जंगलांना आग लागण्याची घटना घडल्या आहेत. मात्र, मे महिन्यात वनवणवा पेटू नये, याची दक्षता घेतली जात आहे.

‘‘ मार्च, एप्रिलमध्ये जंगलांना आग लागण्याचा दरवर्षीचाच अनुभव आहे. त्यामुळे वनविभाग यावेळी सज्ज आहे. जाळरेषा तयार करण्यात आल्या असून एका वनबिटमध्ये एक मजूर नियुक्ती आहे. आग विझवणारे कर्मचारी नेमण्यात आले आहे. मे महिन्यात विशेष काळजी घेतली जाणार आहे.- हेमंत मीणा,उपवनसंरक्षक, अमरावती