शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
3
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
4
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
5
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
6
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
7
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
8
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
9
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
10
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
11
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
12
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
13
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
14
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
15
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
16
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
17
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
18
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
19
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स

बच्चू कडू यांनी दत्तक घेतली चंपाकली हत्तीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 2:43 PM

हत्तिणीला दत्तक घेणारे बच्चू कडू हे पहिले व्यक्ती ठरले आहेत.

ठळक मुद्देमेळघाट व्याघ्र प्रकल्पातील कोलकास येथे घडला खास प्रसंग

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील कोलकास येथे पर्यटकांच्या सेवेत असलेली चंपाकली नामक हत्तीण शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना भावली. त्यांनी पत्नी नयना कडू यांच्या उपस्थितीत २१ हजार ५०० रुपये व्याघ्र प्रकल्पाकडे नगदी भरून तिला दत्तक घेतले आहे.आता ही चंपाकली ना. बच्चू कडू यांच्या नावे ओळखली जाणार आहे. तिला घरी नेता येणार नाही; पण आपला दत्तक हत्ती कसा राहतो, त्याची देखभाल कशी ठेवली जाते, त्याची दिनचर्या काय, त्याला खायला काय दिले जाते, आरोग्याची काळजी कशी घेतली जाते, यांसह अन्य बाबींची माहिती ना. कडूंना घेता येणार आहे. या चंपाकलीला भेटण्याची मुभा त्यांना राहणार आहे. ते मेळघाटात पोहोचल्यानंतर त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था व्याघ्र प्रकल्पाकडून विनामूल्य केली जाणार आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत कोलकास येथे चंपाकली, लक्ष्मी, जयश्री आणि सुंदरमाला नामक चार हत्तिणी आहेत. २२ फेब्रुवारी २०१८ पासून हत्तीण दत्तक योजना आणली गेली. २१ हजार ५०० रुपयांत एक महिन्याकरिता हत्तीण दत्तक देण्याचे निश्चित केले गेले. ज्या कुणाला एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीकरिता हत्तीण दत्तक घ्यावयाची असेल, त्या पटीत ती दत्तक विधानाची रक्कम व्याघ्र संवर्धन फाऊंडेशनकडे भरावी लागते. कुणालाही या चारपैकी कुठल्याही हत्तीणीला दत्तक घेता येते.हत्ती दत्तक घेणाऱ्याला आयकरात ८० टक्के सूटसुद्धा मिळते. ग्रीन सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत वॉन्ट टू अ‍ॅडॉप्ट ए मेळघाट का हाथी ही योजना पुढे आली. या दत्तक योजनेतून हत्तीणीला लागणारे राशनपाणी व अन्य खर्च भागविला जातो.बच्चू कडू पहिले पालक२०१८ पासून ही दत्तक योजना असली तरी आतापर्यंत कुणीही पुढे आलेले नाही. दत्तक घेण्याचे आवाहन व्याघ्र प्रकल्पाकडून देशभर केले गेले. मात्र, हत्तिणीला दत्तक घेणारे बच्चू कडू हे पहिले व्यक्ती ठरले आहेत.इंदिराजीनंतर बच्चू कडूकोलकास येथील वनविश्रामगृह तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मुक्कामाने नावारूपास आले आहे. इंदिरा गांधींचा तो कक्ष बघणारे पर्यटक आजही आहेत. या वनविश्रामगृहाला इंदिराजींमुळे वेगळी ओळख मिळाली. आज कोलकास येथील या चंपाकलीला बच्चू कडू यांनी दत्तक घेतल्यामुळे कोलकास येथील हत्तीलाही नवी ओळख मिळाली आहे.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूMelghatमेळघाट