अमरावती: वातावरणाच्या खालच्या थरात असलेली कमी दाबाचा द्रोणीय स्थिती आणि पूर्वेकडे वाहत आलेले बाष्पयुक्त वारे यांच्या प्रभावामुळे विदर्भासह जिल्ह्यात १६ तारखेला तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या मध्यम पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान तज्ञ अनिल बंड यांनी दिली आहे.
सध्या वारे दक्षिणेकडून वाहायला लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील तापमान वाढ झालेली आहे. कमाल तापमान ३४ अंशापर्यंत तर किमान तापमान १६ अंशापर्यंत वाढले आहे. मध्य महाराष्ट्रावर ९०० मीटर उंचीवर वाहत असलेले चक्राकार वारे आणि इथून केरळ पर्यंत असलेली कमी दाबाची द्रोणीयस्थिती यासोबतच पूर्वेकडून हवेच्या खालच्या स्तरात वाहत असलेले बाष्पयुक्त वारे या हवामानशास्त्रीय परिस्थितीमुळे १७ आणि १८ तारखेला जिल्ह्यात कडकडाटासह विजांसह हलक्या ,मध्यम पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी माहिती बंड यांनी दिली.
कोट
हवामान शास्त्रीय बदलामुळे जिल्ह्यात पुढील दोन दिवसात कडकडाट व विजांसह हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी सावध राहावे पुढील तीन दिवसात किमान तापमान २ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
अनिल बंड
हवामान तज्ञ