अंदाज : किनारपट्टीपर्यंत द्रोणीय स्थितीअमरावती : दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात १६ व १७ फेब्रुवारीला काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. सध्या दक्षिण मध्य बंगालच्या उपसागरापासून हिंदू महासागराच्या विषयवृत्तीय भागापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र कार्यरत असून त्याची तीव्रता कायम आहे. त्यामुळे आसाम, विदर्भासह पश्चिम बंगाल झारखंड व छत्तीसगडपर्यंत हवेच्या वरच्या भागात चक्रीय स्थिती तयार झाली आहे. शिवाय लक्षद्वीपपासून कोकण, गोवा ते अगदी गुजरातच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र (द्रोणीय स्थिती ) तयार झाली आहे. या सर्वांच्या परिणामामुळे मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता पुण्याच्या वेधशाळेने व्यक्त केली आहे. हवामान स्थितीचा अंदाजहवेच्या वरच्या थरात ९०० मीटर उंचीवर आसाम ते विदर्भ कमी दाबाची द्रोणीय स्थिती असून पश्चिम बंगालवर चक्राकार वारे वाहात आहेत. लक्षद्वीप, कोकण, गुजरात किनारपट्टीवर कमी दाबाची द्रोणीय (०.९ किमी उंचीवर) स्थिती आहे. दक्षिण बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र (२.१कि.मी.वर चक्राकार वारे) आहेत. मध्य पाकिस्तानवर पश्चिमी चक्रावात सक्रिय आहे. विदर्भात तापमान (रात्रीचे) २ ते ३ अंश जास्त होते. मध्य भारतात विशेष फरक पडणार नसून पावसाची शक्यता नसल्याचे हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
तुरळक पावसाची शक्यता
By admin | Published: February 17, 2016 12:02 AM