--------------------------
लॉकडाऊनमध्येही काही दुकाने सुरूच
अमरावती : जिल्ह्यात ३० एप्रिलपर्यंत जीवनावश्यकशिवाय अन्य दुकांनाना मनाई असताना शहराच्या अंतर्गत भागात अन्य दुकानेही सर्रास उघडी आहेत. महापालिका व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे.
---------------------------
ग्रामीण भागात वाढला कोरोनाचा संसर्ग
अमरावती : सुरुवातीला केवळ शहरी भागात उद्रेक माजविणाऱ्या कोरिना संसर्गाचा आता ग्रामीण भागातही चांगलाच शिरकाव झालेला आहे. किंबहुना अमरावती शहरापेक्षा अचलपूर, वरूड, अंजनगाव, आदी तालुक्यांत मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढल्याने खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे.
--------------------------
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविणार केव्हा?
अमरावती : एका रुग्णाच्या संपर्कातील २० जणांचा शोध घेण्यात यावा व त्यांच्या चाचण्या करण्यात यावा, असे निर्देश असताना शहरासह जिल्हा ग्रामीण भागात यंत्रणेद्वारा याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढल्याचा नागरिकांचा आरोप आहे.