हवामान खात्याचा अंदाज : ढगाळ वातावरणअमरावती : बंगालच्या उपसागरावरुन येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे सध्या जिल्ह्यासह विदर्भात पावसाचे वातावरण तयार झाले आहे. शनिवार, रविवारी विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला. सोमवारीही हिच स्थिती राहिली. मंगळवारी विदर्भात काही ठिकाणी गारपीटीसह तूरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. विदर्भात अकोला, अमरावती व बुलडाणा जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडला. ढगाळ वातावरणामुळे काही ठिकाणी वातावरणात बदल झाला. तर दिवसाचे तापमान कमी होऊन ३० अंशापर्यंत आले आहे. मध्यभारत आणि दक्षिण भारताच्या उत्तरेकडील भागात बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या उष्ण आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा संगम होत आहे. त्यामुळे हे पावसाचे वातावरण तयार झाले आहे. रविवारी विदर्भाच्या काही भागात किमान तापमानाच्या सरासरीच्या तुलनेत लढनीय वाढ झाली आहे. विदर्भात उत्तर भव्य महाराष्ट्रात मेघ गर्जनेसह पाऊस पहण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.नागपूर येथील विभागीय वेळशाळेच्या अंदाजानुसार पश्चिम विदर्भ, दक्षिण मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथील तापमानात बदल संभवतो. सध्या १८ व १९ जानेवारीला पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड येथील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस येण्याची शक्यता आहे. मध्य भारतात उत्तरेकडून येणारे थंडवारे आणि ओरीसा किनारपट्टीवर येणारे बाष्पयुक्त वारे एकत्र येत असल्याने छत्तीसगड, ओरिसा आणि विदर्भात ढगाळ वातावरण तयार झाले आहे व हलका पाऊस पडलास. अनुकूल स्थिती आहे. २० जानेवारीनंतर रात्रीचे तापमान कमी होणार आहे. -अनिल बंड , हवामान तज्ञ
गारपिटीसह काही ठिकाणी पावसाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2016 12:16 AM