लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : शासनाने कर्जदार शेतकऱ्यांना पीक विम्याची सक्ती केली तरी पाहिजे त्या प्रमाणात मोबदला दिला जात नाही. ही रक्कम खात्यात तातडीने जमा करावी, या मागणीसाठी चांदूर बाजार तालुका काँग्रेस कमिटीने तहसील कार्यालयावर धडक दिली. तहसीलदार शिल्पा बोबडे यांना निवेदन देण्यात आले.तालुक्यात एका शेतकऱ्याला एक एकरावर पाचशे रुपये, तर दुसऱ्याला एका एकरावर एक हजार रुपये असा भेदभाव दिसून आला आहे. या अनुषंगाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा तातडीने जमा करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस तालुकाध्यक्ष किशोर देशमुख यांनी दिला.निवेदन देताना खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष शिवाजी बंड, रमेश घुलक्षे, किशोर किटुकले, प्रकाश जवंजाळ, अवधूत मातकर, सचिन वैराळे, राजाभाऊ बंड, सुरेश नागपुरे, प्रीतम मानापुरे, दिनेश काळे, कृष्णा वानखडे, प्रदीप सायरे, अमित इंगोले आदी उपस्थित होते.
चांदूर बाजार तालुका काँग्रेसची तहसीलवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 1:17 AM
शासनाने कर्जदार शेतकऱ्यांना पीक विम्याची सक्ती केली तरी पाहिजे त्या प्रमाणात मोबदला दिला जात नाही. ही रक्कम खात्यात तातडीने जमा करावी, या मागणीसाठी चांदूर बाजार तालुका काँग्रेस कमिटीने तहसील कार्यालयावर धडक दिली.
ठळक मुद्देपीक विमा : कार्यकर्त्यांचे तहसीलदारांना निवेदन