शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

चांदूरमध्ये १७ हजार हेक्टरचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 10:52 PM

रविवारी झालेल्या गारपिटीसह अवकाळी पावसाने तालुक्यातील २०,५५८ शेतकऱ्यांचे १७ हजार १०३ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाने व्यक्त केला.

ठळक मुद्दे२० हजार ५५८ शेतकऱ्यांचा समावेश : संत्रा, कांदा, हरभरा, गहू पिकांना फटका

सुमित हरकुट।आॅनलाईन लोकमतचांदूरबाजार : रविवारी झालेल्या गारपिटीसह अवकाळी पावसाने तालुक्यातील २०,५५८ शेतकऱ्यांचे १७ हजार १०३ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाने व्यक्त केला. अन्य तालुक्याच्या तुलनेत सर्वाधिक नुकसान चांदूरबाजार तालुक्यात झाले आहे.तालुक्यातील सात मंडळांतील १५४ गावांना गारपिटीने गारद केले. यात शेतकऱ्यांचा संत्रा, कांदा, हरभरा पिकाचे नुकसान झाले. चांदूरबाजार मंडळात ४२७८ हेक्टरमध्ये नुकसान झाले. बेलोरा मंडळात ४५० हेक्टर, तळेगाव मोहना मंडळात ३ हजार ४६९ हेक्टर, करजगाव मंडळात १९० हेक्टर, आसेगाव मंडळात ५९५ हेक्टर, शिरजगाव कसबा मंडळात ४ हजार ३१६, ब्राह्मणवाडा थडी मंडळात ३८०५ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. संत्रापिकाचे ६ हजार ८९५ हेक्टर, कांदा पिकाचे १ हजार ५०३ हेक्टर, गहू १ हजार ७६७ हेक्टर, हरभरा ३ हजार ९३८ हेक्टर व अन्य पिकांचे १४० हेक्टरमधील नुकसान झाले. वादळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश कृषिसेवक व मंडळ अधिकाºयांना दिले असल्याचे तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी सांगितले. याचे तातडीने सर्वेक्षण करून शासनाने मदत जाहीर करावी, अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.अधिकारी-शेतकरी पंचनाम्यासाठी शेतातमहसूल विभाग, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यासह तलाठी, कृषिसेवक, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी सरपंच व गावातील दोन प्रतिष्ठित शेतकरी यांच्याशी संपर्क साधून शेतातील नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रारंभ झाला आहे. गारपिटीचा सर्वाधिक फटका शिरजगाव कसबा मंडळाला बसला आहे.तालुका कृषी अधिकाऱ्याचे पद रिक्तनुकसानीचा खरा अंदाज येण्यासाठी आणखी काही अवधी लागेल. कृषी व महसूल विभाग एकत्र काम करीत आहेत. मात्र, तालुका कृषी अधिकाऱ्याचे पद रिक्त असल्याने कृषी विभागात समन्वयाचा अभाव आहे. खरी आकडेवारी महसूलला द्यावी, यासाठी कृषी विभागाचे अधिकारी चकरा मारत आहेत.अचलपूर तालुक्यातील ५७ गावांत नुकसानरविवारी झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीचा फटका अचलपूर तालुक्यातील ५७ गावांना बसला. त्यामध्ये अडीच हजार हेक्टरवर फळपिके, तर ३८७५ हेक्टरवरील शेती पिके असे एकूण ७९६९ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार निर्भय जैन यांनी दिली.