ब्राह्मणवाडा थडी : येथील १७ सदस्यीय ग्रामपंचायतीत १० जागा जिंकून शेतकरी-शेतमजूर पॅनलने विजय मिळविला. ग्राम विकास पॅनलच्या वाट्याला सहा जागा आल्यात. तिसऱ्या पॅनलचे राजेंद्र उल्हे हे स्वत: विजयी झाले. बाबूभाई इनामदार, राजेंद्र ऊल्हे, नंदकिशोर वासनकर, मुरलीधर ठाकरे, अतुल दारोकर, मोहम्मद अमिर मोहम्मद युसूफ, मोंटू दाभाडे, सुनीता अमृते, अस्मिता चर्जन, रूपाली काळे, अरुण बोरवार, वैशाली इंगोले, सोबिया धुर्वे, सुषमा तायडे, जोहराबी शे. इसा, पद्मा मेसकर व वंदना गवई हे विजयी झाले.
-----------------------
शिरजगाव बंड येथे प्रहारला बळ
चांदूर बाजार : तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणारी शिरजगाव बंड ग्रामपंचायतमध्ये प्रहारचे आठ सदस्य निवडून आले, तर काँग्रेस समर्थित पॅनलचे सात उमेदवार निवडून आले. दोन अपक्ष निवडून आले. यामुळे या ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाकरिता चांगलीच रस्सीखेच होणार आहे. मात्र, तालुक्यातील ‘जोडतोड राजकारणा’चा अनुभव पाहता, प्रहार पुन्हा एकदा शिराजगाव बंड येथे सत्ता काबीज करण्याची शक्यता आहे. येथून अरुण चिंचोले, रंगराव मानापुरे, पायल रावले, विशाल बेले, शिल्पा इंगळे, मो. अस्माबानो, नंदा वाकोडे, मुस्तकीन खान, माधुरी झटाले, मो. इक्बाल, रुकसाना बी, मनीष एकलारे, महानंदा रहाटे, उज्वला मोहोड, भास्कर हिरडे, सारिका बर्वे, केशरबाई पुनकर हे विजयी झाले.
----------------