वैभव बाबरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : 'एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ' या विचारसरणीशी बांधील राहत लोकसहभागातून स्ट्राँग पोलिसिंग करण्याकडे आपला कल आहे. शहरातील गुन्हेगारी व वाहतूक समस्या सामूहिक जबाबदारीतून सोडविणे शक्य आहे. नागरिकांनी समाजात वावरताना मानसिकता बदलायला हवी, तरच खऱ्या अर्थाने समस्या दूर होऊन बदल घडतील, अशी भावना पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.पोलीस आयुक्तांनी गुरुवारी गणेश आगमनाच्या सुरक्षेविषयी आढावा घेतला. त्यावेळी कोतवाली पोलिस ठाण्यात त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. त्यांच्या बोलण्यातून शिस्तप्रियतेसोबत समाजाप्रति बांधीलकी दिसून आली. अंबानगरीतील हाताबाहेर गेलेली वाहतूक समस्या कशी सुटेल, यासंबधाने त्यांनी विस्तृत चर्चा केली. पूर्वीच्या व आताच्या शहरात व्यापक बदल झाला आहे. लोकसंख्येसोबत वाहनांची प्रचंड संख्या वाढली. विकासकामे प्रगतिपथावर आहेत, आगामी काळाच्या दृष्टीने सिमेंट रोडची कामे सुरू आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात बदल घडत असताना काही अडचणींचा सामना करावाच लागणार आहे. त्यातून सकारात्मक मार्ग कसा काढता येईल, यादृष्टीने सांघिक प्रयत्न करायला हवेत. त्यात सर्वात महत्त्वाची आहे ती नागरिकांची मानसिकता. रस्त्याने वाहन चालवताना प्रत्येकाने समाजभान ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीने स्वत: शिक्षक बनून दुसºयाची मानसिकता बदलायला हवी. बदल स्वत:पासूनच सुरू करावा. प्रथम स्वत:ची मानसिकता बदला, नियमात चालण्याची स्वत:ला सवय लावा, त्यानंतरच शहर बदलायला निघा. मग बघा, शहराचा चेहरामोहरा कसा पालटतो, अशी कळकळीची भावना सीपींनी व्यक्त केली. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने प्रयत्न करताना चांगले नागरिक घडविण्याचे काम मी पूर्वीपासूनच करतोय. पुढेही ते सुरुच राहील. अमरावतीकरांनी आपल्या परीने हातभार लावावा. बदल एका रात्रीतून घडत नाही. क्रांतीला निश्चित कालावधी लागतो. मात्र, त्यापूर्वी क्रांतीची बीजी रोवायला हवीत, तर शहराचा कालापालट होण्यास वेळ लागणार नाही, असा दुर्दम्य आशावाद त्यांनी व्यक्त केला.पोलिसांना प्रोत्साहित करापोलीस दिवस-रात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी झटतात. दिवसभर उभे राहून कर्तव्य बजावतात. त्यांची काळजी घेतल्यास, त्यांना प्रोत्साहित केल्यास, ते उत्तम प्रकारे कर्तव्य बजावतील. गुन्हेगारी, अवैध धंदे पूर्णपणे बंद होणे शक्य नसले तरी आम्ही त्यावर अंकुश ठेवण्याचे सातत्याने प्रयत्न करीत आहोत.स्वत:च्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरावाहन चालविताना हेल्मेट वापरायला हवे. नियम असतानाही बहुतांश नागरिक हेल्मेट वापरत नाहीत. मी भातकुली, वलगाव व नांदगाव ठाण्यात गेलो. तेथील पोलिसांना हेल्मेट वापरण्यास सांगितले आहे. कर्तव्य बजावताना आधी स्वत: सुरक्षित आहोत का, हे लक्षात घ्या. तेव्हाच तुम्ही दुसऱ्यांची सुरक्षा करू शकाल, असेही सीपींनी सांगितले.वाहतूक समस्या निराकरणासाठी प्रयत्नशहरातील वाहतुकीविषयी आरटीओ, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. वाहतूक निर्धोक व्हावी, याकडे विशेष देण्यात आले आहे. ते बदल काही दिवसांत दिसतीलच. वाहनचालकांची मानसिकता जोपर्यंत बदलणार नाही, त्यांना शिस्त लागणार नाही, तोपर्यंत नागरिकांना वाहतुकीचे धडे द्यावे लागतील, त्यांच्यात वाहतूक नियमांविषयी जनजागृती करावी लागेल, असे सीपी म्हणाले.
मानसिकता बदला, अमरावती बदलेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 10:06 PM
'एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ' या विचारसरणीशी बांधील राहत लोकसहभागातून स्ट्राँग पोलिसिंग करण्याकडे आपला कल आहे. शहरातील गुन्हेगारी व वाहतूक समस्या सामूहिक जबाबदारीतून सोडविणे शक्य आहे. नागरिकांनी समाजात वावरताना मानसिकता बदलायला हवी, तरच खऱ्या अर्थाने समस्या दूर होऊन बदल घडतील, अशी भावना पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
ठळक मुद्देकायदा, सुव्यवस्थेसाठी बांधीलपोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर