लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अंगणवाडीतून चिमुकल्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातील ‘टेक होम रेशन’ (टीएचआर) उपमा, शिरा, शेवया, सुकळी बंद करून कडधान्य वितरण करण्यात येणार आहे. याबाबत राज्याच्या महिला व बाल कल्याण आयुक्त कार्यालयाने महाराष्ट्र राज्य सहकारी ग्राहक महासंघासोबत करार केला आहे. त्यामुळे आता उपमा, शिरा, शेवया, सुकळी देणे बंद करून त्याऐवजी आता कडधान्य आता बालकांना घरीच भरावे लागणार असून खिचडी व उसळ मात्र देण्यात येणार आहे.राज्यात एकात्मिक बाल विकास विभागांतर्गत अंगणवाडी व मिनी अंगणवाडी केंद्र अस्तित्वात आहेत. या अंगणवाड्यांवर गरोदर महिला व किशोरवयीन मुली तसेच सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील चिमुकल्यांच्या आरोग्याची तपासणी, लसीकरण, पोषण आहार देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अंगणवाडीतील चिमुकल्यांचे संगोपन, आरोग्य तपासणी व पालकांना समुपदेशन तसेच गरोदर व स्तनदा मातांना आरोग्य व आहार याविषयी मार्गदर्शन, किशोरवयीन मुलींना माहिती अंगणवाडी केंद्रामार्फत दिली जाते. पोषण आहाराच्या अनुषंगाने राज्य व केंद्राच्या विविध योजना असून, या योजनांत बरेच बदल करण्यात आले आहेत. या बदलांच्या अनुषंगाने आता अंगणवाडीतील चिमुकल्यांना वितरित होणारे कडधान्य पालकांना घरी नेता येणार आहे. नव्या योजनेंतर्गत मुलांना दरमहा एक किलो गहू, ५०० ग्राम मटकी, चवळी, मसूर डाळ, मूग डाळ, हळद, तेल, मीठ वितरित केले जाणार आहे. कडधान्याचा आहार तयार करून चिमुकल्यांना भरवायचा आहे. अंगणवाडीत मात्र उसळ, खिचडीत बालकांना दिली जाणार आहे.टीएचआर वाटप बंदयोजनेचे योग्य नियोजन करण्यासाठी शासनाच्यावतीने टीएचआर वाटप बंद करण्यात आले आहे.त्याऐवजी आकर्षक पॅकिंगमध्ये कडधान्य वितरित केले जाणार आहे. अंगणवाडीत खिचडी, उसळ वाटप करण्यात येत आहे.आतापर्यंत बालकांना टीएचआरमध्ये सुकळी शिरा, उपमा दिला जात होता. मात्र, यासंदर्भातील पुरवठ्यात काही तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून कडधान्याचा टीएचआर बालकांना पुरविला जात आहे.- प्रशांत थोरात, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण)
अंगणवाडीचा टीएचआर बदलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 1:05 AM
अंगणवाडीतून चिमुकल्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातील ‘टेक होम रेशन’ (टीएचआर) उपमा, शिरा, शेवया, सुकळी बंद करून कडधान्य वितरण करण्यात येणार आहे. याबाबत राज्याच्या महिला व बाल कल्याण आयुक्त कार्यालयाने महाराष्ट्र राज्य सहकारी ग्राहक महासंघासोबत करार केला आहे.
ठळक मुद्देउपमा, शिरा, शेवया बंद । सहा महिने ते तीन वर्षाच्या बालकांना धान्य