६०० प्रकारच्या विविध पुस्तकांचा संच : हजारो पुस्तकांची विक्री अमरावती : भारताचे पहिले पतंप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या भारत सरकारच्या नॅशनल बुक ट्रस्टच्या फिरत्या पुस्तक विक्री रथ रविवारी अंबानगरीत दाखल झाला होता. हा रथ पाहण्यासाठी पुस्तक पे्रमींनी येथील शिवाजी महाविद्यालयाजवळ गर्दी केली होती. नागरिकांच्या सेवेत या सुसज्य रथात ६०० प्रकारची विविध विषयांची पुस्तके येथे विक्रीस उपलब्ध केली होती. येथे अनेक देशभक्तांचे, क्रांतिकारकांचे व संशोधकांचे जीवनचारित्रांच्या इंग्रजी भाषेतीलही पुस्तके विक्रीस उपलब्ध होती. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १ आॅगस्ट १९५७ मध्ये नॅशनल बुक ट्रस्टची (राष्ट्रीय पुस्तक न्याय) या संस्थेची स्थापना केलीे होती. तेव्हा पासून ही ट्रस्ट केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली काम करते. पुस्तक प्रमींसाठी हा रथ चालता बोलता व्यासपीठ ठरत आहे. ग्राहकांना पाहिजे ती पुस्तके येथे उपलब्ध होतात. या प्रत्येक पुस्तकांवर १० टक्के सबसिडी (सूट) देण्यात आली आहे. महाराष्ट्र, गोवा, गुजरातमधून पुस्तकांची ही लक्झरी रविवारी अंबानगरीत दाखल झाली. विदर्भात वर्धा, यवतमाळ व नंतर अमरावतीत दौरा असल्याचे रवि मोहड यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. त्यांच्यासमवेत गोपाल कोकणे, जलालराम वर्मा उपस्थित होते. ग्राहकांना चालता बोलता पुस्तकांची सेवा मिळत असल्यामुळे अनेक पुस्तक प्रमींनी आनंद व्यक्त केला होता. अतिशय देखणी व सजविलेली काचेची ही लक्झरी गाडी (रथ) नागरिकांसाठी विशेष आर्कषण ठरली होती. सोमवारी जिल्हयातील दर्यापूर तालुक्यात हा पुस्तकांचा रथ दाखल होणार आहे. (प्रतिनिधी)
नेहरूंच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या पुस्तकांचा रथ अंबानगरीत
By admin | Published: September 19, 2016 12:21 AM