अमरावती: व्हॉट्सॲपवर वारंवार संदेश पाठवून ३७ वर्षीय महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना गुरुवारी फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. अनोळखी व्यक्तीने महिलेशी ओळख व संपर्क वाढविण्याचा प्रयत्न करून तिचा पाठलाग केला. अखेर पीडित महिलेने फ्रेजरपुरा पोलिसात तक्रार नोंदविली. पोलिसांनी अनोळखी मोबाईल क्रमांकधारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
000000000000000000000000000
बडनेरा येथे रेस्ट हाऊससमोरून दुचाकी लंपास
अमरावती : बडनेरा येथील रेस्ट हाऊससमोरून मनोज सुदामराव नागोसे (२९ रा. शिवाजीनगर, बडनेरा) या तरुणाची दुचाकी चोराने २७ मे रोजी लंपास केली. एमएच २७ एडब्ल्यू २९४४ या क्रमांकाच्या दुचाकीने तो जात असताना, वडिलांचा कॉल आला. दुचाकी थांबवून तो वडिलांशी बोलत असताना दहा फूट चालून गेला. बोलणे संपल्यानंतर वळून पाहिले असता, दुचाकी जागेवर नव्हती. बडनेरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला.
00000000000000000000000
महावितरणचे केबल लंपास
अमरावती : रहाटगाव टी-पाॅईंटवरील अंबा सिटी मार्केट परिसरातून महावितरणचे केबल चोराने गुरुवारी लंपास केले. बर्गीस मानिकनेतु मॅथ्यू (४५, रा. तपोवन, आशा कॉलनी) यांच्या पर्यवेक्षणात येथे सुरू असलेल्या कामावरून ६५६ पैकी १४९ मीटर केबल चोरी गेल्याचे आढळून आले. त्यांनी या घटनेची तक्रार नांदगाव पेठ पोलिसात नोंदविली.
00000000000000000000000000000