शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

‘तो’ चिवडा अद्याप बाजारातच

By admin | Published: September 28, 2016 12:11 AM

‘मनभरी’च्या चिवड्यात आढळलेली तळलेली पाल ग्राहकांच्या दृष्टीने घातक ठरणारी होती.

ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ : ‘मनभरी’कडून ‘रिकॉल’ प्रक्रियेस विलंबअमरावती : ‘मनभरी’च्या चिवड्यात आढळलेली तळलेली पाल ग्राहकांच्या दृष्टीने घातक ठरणारी होती. हा किळसवाणा व घातक प्रकार उघडकीस आल्यानंतर ‘मनभरी’ने तत्काळ चिवड्याचा तो माल बाजारातून ‘रिकॉल’ करायला हवा होता. मात्र, हा चिवडा अद्यापही बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. तो माल ‘रिकॉल’ करण्याच्या सूचना एफडीएने ‘मनभरी’ उत्पादकांना देऊनही त्यात विलंब केला जात आहे. हा ग्राहकांच्या आरोग्याशी हेतुपुरस्सर खेळ करण्याचा प्रकार आहे. मनभरी चिवड्याचे उत्पादन दाभा येथील ‘ओमजी नमकीन’ कारखान्यातून केले जाते. दररोज चिवड्याचे हजारो पॅक तयार करून ते बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविले जातात. हाच चिवडा विमलबाई चुडे यांनी देशपांडे प्लॉट येथील श्रीगणेश डेअरीमधून विकत घेतला होता. त्यामध्ये अख्खी तळलेली पाल आढळून आली होती. हा प्रकार 'लोकमत'ने लोकदरबारी मांडल्यानंतर अन्न व औषधी प्रशासन विभाग खडबडून जागा झाला. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेत श्री गणेश डेअरीच्या संचालकाचे बयाण नोंदविले. तसेच मनभरी ब्रँडच्या दाभा येथील ‘ओमजी नमकीन’ कारखान्यावर धाड टाकून चिवड्याचे नमुने ताब्यात घेतलेत. ते नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविण्यात आले. याप्रकाराबाबत एफडीएकडून मनभरीच्या संचालकाला नोटीस बजावण्यात आली आहे. त्यातच बाजारपेठेत विक्री झालेला चिवडा रिकॉल करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. मनभरी चिवड्याची हजारो पाकिटे बाजारपेठेत असतानाही अद्यापपर्यंत तो माल परत बोलाविण्यात आला नाही. ही मनभरी संचालकाची मुजोर भूमिका ग्राहकांच्या जीवावर उठणारीच आहे. विषाक्त पाल तळली गेलेल्या चिवड्याचा उत्पादित माल बाजारपेठेत आजही विक्री होत आहे. ज्या ग्राहकांना याबाबत माहिती नाही ते ग्राहक आजही मनभरीचा चिवडा विश्वासानेच घेत आहेत. ही बाब ग्राहकांच्या आरोग्यावर परिणाम करणारीच ठरत आहे. मनभरी चिवड्याच्या मालासंदर्भात अद्यापही एफडीए अधिकाऱ्यांना काही सांगण्यात आले नाही. त्यामुळे एफडीए मनभरी संचालकाला मुभा तर देत नाही ना, अशी शंकाही निर्माण झाली आहे.