शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी घडामोड! प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी निर्णय बदलला, सिंदखेड राजामध्ये शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिला
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
4
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
5
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
6
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
7
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
8
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
9
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
10
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
11
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
12
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
13
Mamaearth Shares: कंपनीचा शेअर आपटला; २० टक्क्यांची घसरण, IPO प्राईजच्याही खाली आला भाव
14
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
15
IND vs AUS टेस्टआधी आणखी एक ट्विस्ट; स्पेशल कॉलनंतर पुजारा 'फ्लाइट मोड'वर
16
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
17
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
18
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
19
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
20
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!

बेकायदेशीर बांधकाम तपासणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 10:09 PM

राज्यातील अनेक महापालिका क्षेत्रांमध्ये बेकायदेशीर बांधकामाचा मुद्दा ऐरणीवर असून, त्या अनुषंगाने शहरातील बेकायदेशीर बांधकामधारकांची नाडी तपासली जाईल. शहरात अनधिकृत मालमत्तांची संपूर्ण माहिती घेऊन कारवाईची दिशा निश्चित केली जाईल, अशी माहिती नवनियुक्त महापालिका आयुक्त संजय निपाने यांनी बुधवारी दिली.

ठळक मुद्देसंजय निपाने : महापालिका आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यातील अनेक महापालिका क्षेत्रांमध्ये बेकायदेशीर बांधकामाचा मुद्दा ऐरणीवर असून, त्या अनुषंगाने शहरातील बेकायदेशीर बांधकामधारकांची नाडी तपासली जाईल. शहरात अनधिकृत मालमत्तांची संपूर्ण माहिती घेऊन कारवाईची दिशा निश्चित केली जाईल, अशी माहिती नवनियुक्त महापालिका आयुक्त संजय निपाने यांनी बुधवारी दिली.बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास मावळते आयुक्त हेमंत पवार यांचेकडून निपाने यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. ठाणे महापालिकेत उपायुक्तपदी राहिलेल्या निपाने यांची १२ जून रोजी अमरावती येथे महापालिका आयुक्त म्हणून बदली झाली. त्या आदेशान्वये ते तातडीने रुजू झालेत. त्यांनी माध्यमांशी अनौपचारिक संवाद साधला. आपण महापालिकेतील प्रशासकीय तथा अन्य संपूर्ण कामकाजाचा लेखाजोखा विभागप्रमुखांकडून घेणार असून, त्यानंतर समस्या व प्रश्नांची हाताळणी करण्याबाबत निर्णय घेऊ, व्यापारी संकुलाबाबतचा प्रश्न नियमावलीत बसून सोडविण्यासाठी लवकरच बैठक घेतली जाईल. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये २० ते २२ वर्ष प्रशासकीय कामकाजाचा अनुभव असल्याने महापालिकेचा कारभार यशस्वीरीत्या सांभाळण्याची ग्वाही त्यांनी दिली.महापालिकेची आर्थिक परिस्थिती, अल्प मनुष्यबळ, आकृतीबंध पावसाळापूर्व नियोजन आदी महत्त्वपूर्ण बाबींचा आढावा घेतल्यानंतर त्यावर भाष्य करणे उचित ठरेल, असेही निपाने म्हणाले. मावळते आयुक्त हेमंत पवार यांचेकडून निपाने यांनी महापालिकेची एकंदरीच प्रशासकीय व राजकीय परिस्थिती जाणून घेतली.