अमरावती - येथील पंचवटी चौकातील उड्डाणपुलाला युवा स्वाभिमानतर्फे छत्रपती शिवाजी महाराज हे नाव देण्यात आले. बडने-याचे आमदार रवि राणा, नवनीत राणा यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मंगळवारी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी छत्रपती शिवरायांचा जयघोष करण्यात आला.देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात असताना राणा दाम्पत्यांनी पंचवटी चौकातील उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराज असे नामकरण करून शिवरायांना मानाचा मुजरा केला. या सोहळ्यापूर्वी आ. रवि राणा, नवनीत राणा यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला हार्रापण करून पूजन करण्यात आले. ‘जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ ’ च्या जयघोषांनी पंचवटी चौक दणाणून गेला. या सोहळ्याला अभिजित देशमुख, गौरव किटुकले, सुमती ढोके, शैलेंद्र कस्तुरे, सोनू रूगंठा, गणेश मारोटकर, संतोष कोलटके, निलेश भेंडे, मनोहर काळमेघ, मनीष मोहोड, गोपाल वंजारी, निलेश कांबळे, बंटी टाके, नितीन तायडे आदी उपस्थित होते.
पंचवटी उड्डाणपुलाला दिले छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 4:14 PM