शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

छत्री तलाव ठरतोय पक्ष्यांची पंढरी...!

By admin | Published: December 05, 2015 12:18 AM

अंबानगरीचे वनवैभव असलेल्या छत्री तलावावर आजपर्यंत २१४ पक्ष्यांची नोंद पक्षिमित्रांनी केली आहे. त्यात दुर्मिळ व स्थंलातरित पक्षीही आढळले आहेत.

२१४ पक्ष्यांची नोंद : दुर्मिळ, स्थलांतरित पक्षीही आढळलेअमरावती : अंबानगरीचे वनवैभव असलेल्या छत्री तलावावर आजपर्यंत २१४ पक्ष्यांची नोंद पक्षिमित्रांनी केली आहे. त्यात दुर्मिळ व स्थंलातरित पक्षीही आढळले आहेत. छत्री तलाव जणू पक्ष्यांची पंढरीच बनली आहे. शहराची प्राचीन ओळख असणारे छत्री तलाव, वडाळी तलाव व पोहरा मालखेडचे जंगल हा भाग पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्याप्रमाणे पंढरीच्या देवस्थानात भाविकाचा लोंढा असतो, त्याचप्रमाणे पक्ष्यांचे थवेच्या थवे तलावावर येत आहेत. पूर्वी हा तलाव अमरावती शहराची तहान भागवायचा. मात्र काळाच्या ओघात छत्री तलावाची ही ओळख स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनामुळे होत आहे. वन्यजीव अभ्यासक यादव तरटे हे १५ वर्षांपासून पक्षिनिरीक्षणाचे कार्य करीत आहेत. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या निरीक्षणात तब्बल ६४ प्रकारचे स्थलांतरित पक्षी येथे दरवर्षी हजेरी लावतात. छत्री तलाव परिसरात एकूण ८५ प्रकारचे पाणपक्षी व १२९ प्रकारचे रानपक्षी पक्षी आढळले आहेत. निसर्ग लेखक प्रदीप हिरुरकर, वैभव दलाल, मनोज बिंड, कृष्णा खान, धनंजय भांबूरकर, सुरेश खांडेकर, अमित ओगले, राहुल गुप्ता, सचिन सरोदे, सचिन थोते, शशी ठवळी, प्रफुल्ल गावंडे पाटील व क्रांती रोकडे यांचे यासाठी सहकार्य लाभले. संकटग्रस्त नऊ पक्ष्यांची नोंदआययूसीएनच्या यादीत असलेला काळ्या पोटाचा सुरय या अतिदुर्मिळ स्थलांतरित पक्ष्याचे दर्शन महत्त्वाचे आहे. यातील काळ्या शेपटीचा पाणटिवळा, नदी सुरय, काळ्या डोक्याचा अवाक, करोता, मोठा गिजरा, चिमण शेंद्या, कामरा ढोक असे एकूण नऊ संकटग्रस्त पक्ष्यांची नोंद आहे.प्रदूषणाचा विळखाअलीकडच्या काळातील प्रदूषणामुळे पक्षी जीवनाला ग्रहण लागले आहे. अमरावती शहर फुगत चालले आहे. आता नवनवीन प्रकल्प येऊ घातले आहेत. आधीच निर्माल्य व प्लास्टिकमुळे येथील प्रदूषण वाढलेले आहे. सावजीचे कार्य मोलाचेछत्री तलाव परिसरातील स्वच्छतेसाठी अविनाश सावजी यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहे. स्वच्छतेची कास धरणारे सावजी यांनी व त्यांच्या सहकार्यांनी छत्री तलाव स्वच्छ करून मोलाचा वाटा उचलला आहे.