चिखलदरा : चिचाटी धबधब्यावर अमरावती येथील एका कोचिंग क्लासने काढलेल्या सहलीत गेलेल्या श्रीनिधी सकळकळे या विद्यार्थ्यांच्या मृत्यूची चौकशी चिखलदरा पोलिसांनी सुरू केली असून, रविवारी परिवाराचे नोंदविले.
१३ जुलै रोजी अमरावती येथील एक कोचिंग क्लासने चिखलदरा येथे शंभरपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना सहलीसाठी नेत असल्याचे पालकांना सांगून थेट काटी येथील धबधब्यावर नेण्यात आले. तेथे श्रीनिधी प्रवीण सकळकळे (१७, रा. वृंदावन वसाहत अमरावती) या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. संबंधित कोचिंग क्लासच्या शिक्षकांनी सर्व प्रकार नियमबाह्य सहल काढली व पालकांना खोटी व दिशाभूल करणारी माहिती दिली. विक्रम विजय तळोकार या कोचिंग क्लासच्या प्रमुखांसह इतर शिक्षकांसह संबंधितांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना एका निवेदनाद्वारे वडील प्रवीण सकळकळे यांनी केली होती. या प्रकरणात राजापेठ पोलिसांनी मृत्यूसंदर्भात नोंद घेऊन चिखलदरा पोलिसांना झिरोची डायरी पाठविली होती. त्यावरून पोलिसांनी सदर प्रकरणात चौकशी आरंभली आहे. चिखलदरा पोलिसांना बयाणात पालकांनी केलेल्या आरोपीसह सर्व बाबींची चौकशीची मागणी केली आहे.
बॉक्स
शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा
श्रीनिधी हा इयत्ता बारावीचा विद्यार्थी होता. अत्यंत हुशार आणि सुस्वभावी, अशी त्याची ओळख परिवार आणि परिसरात होती. त्याच्या मृत्यूनंतर जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यामुळे चिखलदरा पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल लवकर प्राप्त व्हावा म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयाला पत्र दिले आहे.
कोट
या मृत्यू प्रकरणात परिवारातील सदस्यांचे बयाण नोंदविले असून, पुढील चौकशी सुरू आहे.
- राहुल वाढवे,
ठाणेदार चिखलदरा
180721\1948-img-20210718-wa0107.jpg
सकळकळे परिवाराचे बयाना नोंदविताना चिखलदरा पोलीस