अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवार २८ आणि शनिवार २९ नोव्हेंबर रोजी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. शुक्रवार २८ नोव्हेंबर रोजी दुपारी २.५५ वाजता नागपूर येथील रामगिरी निवासस्थानाहून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हेलीपॅडवर आगमन व शासकीय मोटारीने विभागीय आयुक्त कार्यालयाकडे प्रयाण करतील. दुपारी ३ वाजता विभागीय आयुक्तालयात आगमन व अधिकाऱ्यांशी पूर्वचर्चा. दुपारी ४ वाजता खासदार व आमदार, अतिरिक्त मुख्य सचिव कृषी, नियोजन, वित्त, आरोग्य, प्रधान सचिव, आदिवासी विकास, प्रधान सचिव ऊर्जा, सचिव जलसंपदा, विभागीय आयुक्त यांच्यासमवेत विभागीय आढावा बैठक घेणार आहेत.मेळघाटातील गावांना भेटीसायं. ६ वाजता वेळ राखीव (किशोर तिवारी ). सायं.६.१५ वाजता पत्रकार परिषद . सायंकाळी ६.३० वाजता शासकिय विश्रामगृह येथुन सायं.६.३५ वाजता आगमन व राखीव.सायंकाळी ६.५० वाजता शासकीय विश्रामगृह येथून शासकीय मोटारीने जिल्हा भाजपा पक्ष कार्यालयाकडे प्रयाण नंतर सायंकाळी ७ वाजता भाजप कार्यकर्त्यांसमवेत चर्चेसाठी राखीव नंतर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. शनिवारी सकाळी७.५० वाजता शासकीय विश्रामगृह येथून संत गाडगेबाबा विद्यापीठ हेलिपॅडकडे प्रयाण.सकाळी ८ वाजता हेलिपॅड आगमन व हेलिकॉप्टरने बोरी ता.धारणीकडे प्रयाण.सकाळी८.३० वाजता वसुंधरा आदिवासी आश्रमशाळा बोरी हेलीपॅड येथे आगमन. तेथून सकाळी८.४० ला बोरी हेलिपॅड येथून शासकीय मोटारीने मालुरकडे रवाना आणी . सकाळी ९.२० वाजता मालुर येथे आगमन आदिवासी कुटुंबाना भेट, वनहक्क लाभार्थी सदस्यांसोबत चर्चा व म.ग्रा.रोहयो कामाची पाहणी. त्यानंतर सकाळी १०.१० वाजता चौराकुंड येथे आगमन व चौराकुंड येथील अंगणवाडी केंद्राला भेट व सामुहिक वनहक्क धारकांशी चर्चा त्यानंतर सकाळी 10.35 वाजता हरिसालकडे प्रयाण. सकाळी १० .५० वाजता हरिसाल येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या आश्रमशाळेला भेट व प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट व पत्रकारांशी संवाद. त्यानंतर कोलकासकडे प्रयाण. दुपारी १२ वाजता कोलकास येथे अधिका?्यांशी आढावा बैठक. दुपारी १२.३० वाजता राखीव. दुपारी १ वाजता कोलकास येथून वसुंधरा आदिवासी आश्रमशाळा बोरी हेलीपॅडकडे प्रयाण. दुपारी १.३० वाजता बोरी हेलीपॅड आगमन व हेलीकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवस जिल्ह्यात
By admin | Published: November 27, 2014 11:25 PM