लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शकुंतला रेल्वेबाबत आमदार-खासदारांसह लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. येत्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्याची आग्रही मागणी ते मुख्यमंत्र्यांसमोर ठेवणार आहेत.शकुंतलेच्या ब्रॉडगेजबाबत खा. आनंदराव अडसूळ यांनी अचलपूर, पथ्रोट, अंजनगाव, दर्यापूर येथे बोलताना रविवारी ही बाब स्पष्ट केली. शकुंतला रेल्वे लाइन ब्रॉडगेज करण्यासाठी संसदीय पीटिशन कमिटीमध्ये प्रकरण दाखल करीत २०१२-१३ च्या सर्वेक्षणानुसार २१४७ कोटी अंदाजपत्रकात मंजूर करून घेतल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.राज्य सरकार सकारात्मक असून, येत्या अर्थसंकल्पात निश्चितच तरतूद करवून घेऊ, असा आशावाद आ. रमेश बुंदीले यांनी अंजनगाव रेल्वे स्थानकावर व्यक्त केला. शकुंतलेच्या ब्रॉडगेजकरिता जो खर्च अपेक्षित असेल, त्यापैकी अर्धा हिस्सा राज्य सरकारने उचलावा. अर्थसंकल्पात तशी तरतूद न केल्यास आमदारांसह लोकप्रतिनिधी याच शकुंतलेतून टप (छप्पर) वाजवत प्रवास करतील, असेही आ. बुंदीले यांनी स्पष्ट केले.दरम्यान, अचलपूरच्या नगराध्यक्ष सुनीता फिसके, अंजनगाव नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे, दर्यापूर नगराध्यक्ष नलिनी भारसाकळे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हिंगणीकर, प्रताप अभ्यंकर, अचलपूर पंचायत समिती सभापती देवेंद्र पेटकर, डॉ. सुरेश ठाकरे, डॉ. राजेश उभाड, गजानन कोल्हे, जितेंद्र रोडे, प्रतिभा साहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल कुलट, काशीनाथ बºहाटे, प्रमोद गोरडे, राजकुमार महल्ले, प्रमोद तुरखडे, विनोद घुलक्षे, प्रवीण पाटील, गजानन हिवसे, योगेश खानझोडे, राजा धर्माधिकारी, संजय गुल्हाने, विजय डकरे, विजय, अंजनगाव खरेदी-विक्री संघाचे संचालक बंडू येवले, गजानन, प्रेमकुमार बोके, अंजनगावचे माजी सभापती शशिकांत मंगळे, जि.प. आरोग्य सभापती बळवंत वानखडे, शेतकरी नेते विजय विल्हेकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुधाकर भारसाकळेंसह उपस्थित मान्यवरांनी शकुंतलेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर व्हायलाच हवे, असे आग्रही प्रतिपादन केले.
शकुंतलेबाबत लोकप्रतिनिधी भेटणार मुख्यमंत्र्यांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 11:09 PM
शकुंतला रेल्वेबाबत आमदार-खासदारांसह लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. येत्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्याची आग्रही मागणी ते मुख्यमंत्र्यांसमोर ठेवणार आहेत. शकुंतलेच्या ब्रॉडगेजबाबत खा. आनंदराव अडसूळ यांनी अचलपूर, पथ्रोट, अंजनगाव, दर्यापूर येथे बोलताना रविवारी ही बाब स्पष्ट केली.
ठळक मुद्देअंदाजपत्रकात २१४७ कोटी रुपये मंजूर : साहित्यिकदेखील मांडणार जीवाभावाच्या रेल्वेगाडीची व्यथा