लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : भरमसाट कर लावण्यात धन्यता समजणारे विद्यमान सरकार आहे. लहान-मोठ्या उद्योग-व्यवसायांसाठी कुठलीच योजना यांच्याजवळ नाही आणि व्यापाऱ्यांवर निर्बंध घालण्याशिवाय काहीच करीत नसल्याचे सत्य आहे. मुख्यमंत्र्याच्या नागपूर शहरातच तब्बल दीडशे उद्योगधंदे बंद झाल्याची शोकांतिका आहे. व्यापाऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. सरकार कुणाचे असो, ते व्यापारीविरोधी आहे. मात्र, आता लक्ष्यात ठेवा, सरकार कुणाचेही असो, आमच्याशिवाय ते बनणार नाही, असा इशारा अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मंगळवारी दिला.महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर यांच्यावतीने मंगळवारी अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या चिली गोदामात आयोजित शेतकरी-व्यापारी विशेष संवाद कार्यक्रमात बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, इंटरनॅशनल रिलेशन कमिटीचे अध्यक्ष रवींद्र मानगावे, अमरावती चेंबर्स आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष विनोद कलंत्री, अकोला येथील अध्यक्ष कैलास खंडेलवाल, महाराष्ट्र चेंबर्स आॅफ कॉमर्सचे संचालक सतीशकुमार व्याससह मान्यवर व विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.आ. कडू पुढे म्हणाले, कांद्याला जीवनावश्यक वस्तूंमध्ये शासनाने टाकले. मात्र, कांदा न खाल्ल्याने कुणी मरतं का? खरं तर कांद्यामुळे सरकारे गेली. त्यामुळे शासनाला सर्व काही सोडून कांद्याची काळजी आहे. कांद्याचे भाव वाढताच शासनाने व्यापाऱ्यांच्या गोदामावर धाडी टाकल्या. व्यापाऱ्यांनी दोन हजार रुपये क्विंटलने खरेदी केलेला कांदा ३०० रुपयांना विकला. व्यापाऱ्यांशिवाय देशात चालू शकत नाही. तेव्हा शासनाने व्यापाऱ्यांची बाजू समजावून घेण्याची गरज आहे. मी व्यापाऱ्यांना मदत करेन, असे आश्वासन बच्चू कडू यांनी यावेळी दिले.मॉलनंतर आॅनलाइन संस्कृतीराज्यात मॉल संस्कृतीनंतर आॅनलाइन संस्कृतीने व्यापाºयांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे आपण सर्व या संपूर्ण स्पर्धेत उतरण्यासाठी नवतरुणांना पुढे आणण्याची गरज आहे. सबसिडी पेक्षा रिटर्न्सवर इंटरेस्ट कमी करण्याची मागणी व्यापाºयांनी केली. विदर्भात चेंबरचे काम वाढवायचे असल्याने सर्व व्यापाºयांना एकजूट होण्याचे आवाहन मंडलेचा यांनी केले.संत्रा प्रक्रिया उद्योगअचलपूर नजीकच्या भूगाव येथील २०० हेक्टर जमीन एमआयडीसीसाठी मागण्यात आली आहे. लवकरच संत्रा प्रक्रिया उद्योग उभा होईल. मुंबईच्या एका बँकेने होकार दिला आहे, असे आ. कडू म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात दीडशे उद्योग बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 10:27 PM
भरमसाट कर लावण्यात धन्यता समजणारे विद्यमान सरकार आहे. लहान-मोठ्या उद्योग-व्यवसायांसाठी कुठलीच योजना यांच्याजवळ नाही आणि व्यापाऱ्यांवर निर्बंध घालण्याशिवाय काहीच करीत नसल्याचे सत्य आहे.
ठळक मुद्देबच्चू कडू : शेतकरी-व्यापारी विशेष संवाद कार्यक्रम