लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मागिल वर्षी दहावीच्या कलचाचणीच्या निकालपत्रावर स्वत:चा फोटो टाकला होता. त्यामुळे त्यांच्यावर सर्वत्र टीका झाली होती. त्यामुळे ही चूक यावेळी दुरूस्ती होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, यावर्षी शिक्षणमंत्र्यांबरोबर मुख्यमंत्री देखील निकालपत्रावर झळकले आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांचा कल जाणून घेण्यासाठी त्यांची कलचाचणी घेण्यास मागील वर्षापासून सुरूवात झाली आहे. कलचाचणी मोफत असल्याचे सांगितल्यानंतर लागलीच शासनाने इयत्ता दहावीच्या परीक्षा शुल्कात वाढ केली होती. त्यामुळे या कल चाचणीची शुल्क वसुली होणार असल्याचा सूर उमटत होता. मागील वर्षी विद्यार्थ्यांच्या निकालाच्या कागदावर शिक्षणमंत्री तावडे यांचा फोटो पाहून आश्चर्य व्यक्त केले जात होते.यंदा तर त्यावर खुद्द मुख्यमंत्र्यांचा फोटो झळकल्याने हा नेमका प्रकार काय, याबाबत विविध चर्चांना ऊत आला आहे. आता यावर पुन्हा टीकेची झोड उठल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
कलचाचणी निकालावर आता मुख्यमंत्र्यांचा फोटो
By admin | Published: June 28, 2017 12:21 AM