आॅनलाईन लोकमततिवसा : भीमा कोरेगाव घटनेचे संतप्त पडसाद तिवसा शहरात उमटले. मंगळवारी आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरसंघचालक मोहन भागवत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला.येथील आंबेडकर पुतळ्यापासून बाबासाहेब आंबेडकर यांना हारार्पण करून हा मार्च पेट्रोलपंप चौकात आला यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरएसएसप्रमुख मोहन भागवत यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत रस्त्यावर पुतळा जाळून संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. आंदोलनात आशिष ढोले, राज मोहोरे, गजानन रामटेके, प्रफुल्ल मकेश्वर, सिद्धार्थ मुद्रे, प्रशिक मकेश्वर, विनोद तांगडे, अजय दलाल, सूरज मकेश्वर, सतीश यावले, शिवा शापामोहन, रुपेश मकेश्वर आदींचा समावेश होता.
सरसंघचालकांसह मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 10:30 PM
भीमा कोरेगाव घटनेचे संतप्त पडसाद तिवसा शहरात उमटले. मंगळवारी आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरसंघचालक मोहन भागवत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला.
ठळक मुद्देतिवस्यात जाळपोळ : भीमा-कोरेगाव प्रकरणाचे पडसाद