अनिल कडू लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : बहिरम यात्रेपाठोपाठ चिखलदरापर्यटन महोत्सव रद्द करण्यात आला आहे. प्रशासनाकडून याकरिता कोरोनाचे कारण पुढे करण्यात आले आहे.राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या नेतृत्वात २०, २१ व २२ नोव्हेंबर १९९२ ला चिखलदरा येथे पहिला पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला. गाविलगडच्या दर्शनी भागात आदिवासी कला महोत्सवाच्या नावावर आयोजन करण्यात आल्यामुळे तो गाविलगड महोत्सव या नावाने ओळखला गेला. महोत्सवाकरिता मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक हे त्यावेळी चिखलदऱ्यात मुक्कामी होते. त्यानंतर तब्बल १४ वर्षांचा खंड पडला. पुढे २५ ते २७ फेब्रुवारी २००६, २३ ते २५ डिसेंबर २००६ आणि २३ ते २५ डिसेंबर २००७ दरम्यान चिखलदरा पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला. तीन वर्षांच्या ब्रेकनंतर २८ ते ३० जानेवारी २०११ दरम्यान आणि त्यानंतर सन २०१५, २०१६ व २०१७ मध्ये पर्यटन महोत्सवाचे आयोजन केले गेले. दरम्यान, राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पर्यटनाकडे लक्ष पुरविले. जिल्हाधिकाऱ्यांसह पर्यटन विभाग आणि प्रशासकीय यंत्रणेसोबत बैठकाही घेतल्या. यामुळे यंदा चिखलदरा पर्यटन महोत्सवाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण, कोरोनाने त्यात मोडता घातला. या महोत्सवाची दरवर्षी कलाप्रेमींची प्रतीक्षा असते. ती यंदाही पूर्ण होणार नाही.
कोरोनामुळे चिखलदरा पर्यटन महोत्सव रद्द !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 5:00 AM
अनिल कडू लोकमत न्यूज नेटवर्क परतवाडा : बहिरम यात्रेपाठोपाठ चिखलदरा पर्यटन महोत्सव रद्द करण्यात आला आहे. प्रशासनाकडून ...
ठळक मुद्देआदिवासी कलेला दुसऱ्या वर्षीही रसिक मुकणार