शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

चिखलदरा पर्यटनस्थळ गेले खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 10:05 PM

विदर्भा$चे नंदनवन असलेले चिखलदरा पर्यटनस्थळावरील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने पर्यटकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिका प्रशासन आंधळ्याचे सोंग घेऊन असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देपर्यटकांमध्ये संताप : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, पालिका झोपेत

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : विदर्भा$चे नंदनवन असलेले चिखलदरा पर्यटनस्थळावरील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने पर्यटकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिका प्रशासन आंधळ्याचे सोंग घेऊन असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.विदर्भाची एकमेव पर्यटनस्थळ असे नावलौकिक असलेले चिखलदरा रस्ता, पाणी, वीज या पायाभूत सुविधांपासून आजही वंचित असल्याचे सत्य आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी दरवर्षी शासनाकडून पालिका सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला जातो. प्रत्यक्षात मर्जीतील अनावश्यक कामावरच तो खर्च केला जात असल्याचे सत्य आहे. ‘ठेकेदारांची नगरपालिका’ अशी बदनामीकारक ओळख पालिकेला आहे. त्यामुळे विकासकामांचा चिखलदऱ्यात बट्ट्याबोळ झाला आहे. एकमेव प्रमुख मार्गावर गेल्या तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात खड्डे बसले पडले असताना, त्यावर मुरुम किंवा तात्पुरती डागडुजी करण्याचे धाडस नगरपालिका किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाने दाखविले नाही. आंतरराज्य महामार्गाशी हा मार्ग जोडला गेला असताना, त्यावर दुरुस्ती-देखभाल खर्च लाखो रुपये दाखवण्यात आला. तरीसुद्धा अपघाताला आमंत्रण देणारे रस्ते पर्यटकांच्या जीवावर बेतले आहेत.मुख्य चौकाची दैनावस्थापाच हजार लोकसंख्या असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेला केवळ एक मार्ग आहे. त्यावरही दोन ते तीन फुटापर्यंत खड्डे आहेत. मुख्य चौकात पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. १९ नगरसेवक दिवसभर किमान १० वेळा या रस्त्यावरून जातात. त्यांना खड्ड्यांचे गचके जाणवत नाहीत का, हे मात्र कोडे आहे.पर्यटक कर नावाची लूटचिखलदरा पर्यटनस्थळावर वीजपुरवठ्याचा लपंडाव नेहमीची बाब झाली आहे. उन्हाळ्यात दरवर्षी पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे सत्य आहे. कालपर्यंत विविध पॉर्इंटवरील खड्ड्यात गेलेले रस्ते दुरुस्त होत नसताना, आता मुख्य चौकासह रस्त्यावर पडलेले खड्डे एक ना धड भाराभर चिंध्या म्हणायची वेळ या पर्यटन स्थळाच्या विकासाबद्दल आली आहे. कुठलीही सुविधा मिळत नसताना घेतला जाणारा पर्यटक कर ही शुद्ध लूट ठरली आहे.सदर मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे. पर्यटकांची गैरसोय पाहता त्यावर मुरुम टाकण्यात येईल.- सूर्यकांत पिदुरकर, मुख्याधिकारी, न.प. चिखलदराखड्ड्यात मुरुम टाकल्यास चिखल होईल. यामुळे पाऊस उघडण्याची वाट पाहत आहोत.- नितीन देशमुखउपविभागीय अभियंता सा.बा. विभाग, चिखलदरा