नरेंद्र जावरे ।लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : पारंपरिक पूजेसाठी शेतात असलेल्या आदिवासी कुुटंबातील पाच वर्षीय मुलावर बिबट्याने झेप घेतली अन् कसलाही विचार न करता बापाने आपला हातच त्या बिबट्याच्या तोंडात दिला. कावराबावरा झालेल्या बिबट्याने क्षणभराची उसंत घेताच परिसरातील लोकांनी धाव घेत दगड-काठ्यांचा मारा करीत बिबट्याला पिटाळले. या थरारक घटनेत अतुलनीय धाडस आणि समयसूचकता दाखविणारा बाप गंभीर जखमी झाला.रामलाल दहीकर (४५, रा. बागलिंगा) असे जखमी आदिवासी शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. आदिवासी शेतात देवी-देवतांची पारंपरिक पूजा करतात. शनिवारी सकाळी ९.३० वाजता रामलाल हे पत्नी मुन्नीबाई, आई पुनय व चिमुकला दुर्गेशला नेले होते. पूजत मग्न असताना शेतातील पिकात लपलेल्या बिबट्याने आपली शिकार साधण्यासाठी दुर्गेशवरच झेप घेतली. बाजूलाच असलेल्या रामलाल यांनी पोटच्या गोळ्याला वाचविण्यासाठी क्षणात बिबट्याच्या तोंडात हात दिला.आरडाओरड अन् बिबट्याची काठीने पिटाईबिबट्या परत दुसरा हमला करणार तोच उपस्थित सदस्यांनी काठीने बिबट्याला चोप देत आरडाओरड केल्याने नजीकच्या शेतातून सुकलाल कासदेकर, सुरेश धांडेकरसह गावकरी पळत आले. त्यांनी आरडाओरड व दगडफेकीत बिबट्याला पिटाळून लावले. या संपूर्ण घटनेने बागलिंगा, वस्तापूर पंचक्रोशीत दहशत पसरली आहे. नपरिक्षेत्र अधिकारी डी.के. मुनेश्वर, वनपाल अभय चंदेले, एस.जे. कोठाई आदी वनकर्मचाºयांनी तात्काळ जखमी रामलाल दहीकर यांना अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ भरती केले.गावात दवंडी; वाघ नव्हे बिबटवाघाने हमला केल्याची वार्ता वाºयासारखी पसरल्याने परिसरात दहशत माजली होती. वनाधिकाºयांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली. त्यानंतर तो वाघ नव्हे, तर बिबट्या असल्याचे स्पष्ट झाले. कुणीच जंगलात जाऊ नये, पुन्हा हल्ला होऊ शकतो, अशी दवंडी गावांत देण्यात आली. नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन वनविभागाने केले.बागलिंगा येथे शेतात पूजा करताना शेतकºयावर बिबटाने हल्ला केला. त्यांच्यावर उपचार सुरू असून, वन विभागाच्यावतीने सतर्कतेचा इशारा नागरिकांना देण्यात आला आहे.- डी.के.मुनेश्वर, वनपरिक्षेत्र अधिकारी, चिखलदरा
मुलावर हल्ला; बिबट्याच्या तोंडात घातला पित्याने हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 10:12 PM
पारंपरिक पूजेसाठी शेतात असलेल्या आदिवासी कुुटंबातील पाच वर्षीय मुलावर बिबट्याने झेप घेतली अन् कसलाही विचार न करता बापाने आपला हातच त्या बिबट्याच्या तोंडात दिला. कावराबावरा झालेल्या बिबट्याने क्षणभराची उसंत घेताच परिसरातील लोकांनी धाव घेत दगड-काठ्यांचा मारा करीत बिबट्याला पिटाळले. या थरारक घटनेत अतुलनीय धाडस आणि समयसूचकता दाखविणारा बाप गंभीर जखमी झाला.
ठळक मुद्देमेळघाटच्या बागलिंगा येथील घटना