शहरं
Join us  
Trending Stories
1
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
2
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
3
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
4
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
5
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
6
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
7
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
8
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
9
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
10
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
11
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
12
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
13
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
14
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
15
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
16
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
17
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
18
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
19
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
20
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 

बाल संरक्षण कक्षाने पुन्हा रोखला बालविवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 4:12 AM

(फोटो) अमरावती-अचलपूर : जिल्ह्यातील बालविवाहांचे सत्र थांबता थांबत नसल्याचे दिसून येत आहे. दीड महिन्यांत सहा बालविवाह रोखण्यात बाल ...

(फोटो)

अमरावती-अचलपूर : जिल्ह्यातील बालविवाहांचे सत्र थांबता थांबत नसल्याचे दिसून येत आहे. दीड महिन्यांत सहा बालविवाह रोखण्यात बाल संरक्षण कक्षाला यश आले आहे. दोन दिवसांपूर्वीच मोर्शी तालुक्यात दोन बहिणींचे बाल विवाह रोखल्यानंतर शुक्रवारी पुन्हा अचलपूरमध्ये एका १५ वर्षीय बालिकेचा विवाह रोखण्यात आला.

बाल संरक्षण कक्ष आणि अचलपूर पोलीस ठाण्याला हा बालविवाह २६ तारखेला होत असल्याची गोपनीय तक्रार मिळाली. तात्काळ जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले आणि बाल संरक्षण अधिकारी भूषण कावरे यांनी चाईल्ड लाईनचे अमित कपूर व अजय देशमुख यांच्यासोबत अचलपूर गाठले. पोलीस ठाण्यामधून मदत घेऊन वधुपक्षाकडे जाऊन मुलीच्या आई-वडिलांसोबत वर मुलाची बैठक घेऊन त्यांच्याकडून मुलीचे १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत लग्न न करण्याचे हमीपत्रक लिहून घेण्यात आले तसेच विवाह केल्यास गुन्हा नोंदवून कारवाई करण्याची तंबी देण्यात आली. या कार्यवाहीमध्ये अचलपूर पोलीस ठाणे, बाल संरक्षण कक्ष अमरावती व चाईल्ड लाईन प्रतिनिधी होते.

कोट

अल्पवयीन बालकाचा विवाह होऊ नये, याकरिता जिल्हा बाल संरक्षण कक्षातील अधिकारी-कर्मचारी परिश्रम घेत आहेत. सातत्याने संबधित टेकहोल्डच्या संपर्कात आहे. यामुळेच बालविवाह थांबविण्यात जिल्हा बाल सरंक्षण कक्षाला यश येत आहे.

- अजय डबले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी