शहरं
Join us  
Trending Stories
1
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
2
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
3
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
4
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
5
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
6
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
7
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
8
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
9
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
10
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
11
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
13
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
14
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
15
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
16
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
17
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
18
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

बोगस डॉक्टरच्या उपचारामुळे बालकाचा मृत्यू

By admin | Published: September 10, 2015 12:10 AM

दीड वर्षाच्या चिमुरड्यावर बोगस डॉक्टरने चुकीच्या पध्दतीने उपचार केल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सोनोरा येथील घटना : डॉक्टरने काढला पळ, शोधार्थ पोलीस पथक रवाना चांदूररेल्वे : दीड वर्षाच्या चिमुरड्यावर बोगस डॉक्टरने चुकीच्या पध्दतीने उपचार केल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना चांदूररेल्वे तालुक्यातील सोनोरा (भिलटेक) येथे मंगळवारी सायंकाळी घडली. घटनेनंतर बोगस डॉक्टरने घटनास्थळाहून पोबारा केला. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. डॉक्टरच्या चुकीच्या उपचारामुळे मृत्यूमुखी पडलेल्या बालकाचे नाव सोहम अजय खोब्रागडे असे आहे. सर्दी खोकला व ताप आल्याने त्याला गावानजीकच्या पळसखेड येथील डॉक्टर आशिष रॉय यांच्या दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले होते. डॉक्टर रॉय याने बालकाची तपासणी करुन औषधी दिली. औषध घेताच सोहमची प्रकृती खालावली. तातडीने त्याला चांदूररेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. सोहमचा मृत्यू चुकीच्या औषधोपचाराने झाला असा आरोप सोहमच्या नातेवाईकांनी केला आहे. घटनेनंतर बोगस डॉक्टर पसार झाला. चांदूररेल्वेचे ठाणेदार बोबडे यांनी डॉक्टरला शोधण्यासाठी विशेष पथक पळसखेडकडे रवाना केले आहे. ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचाी संख्या अधिक असल्याची ओरड सतत होत असते. या डॉक्टरांकडून ग्रामस्थांच्या आरोग्यासोबत सुरू असलेला खेळ थांबविण्यासाठी कडक कारवाईची गरज आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. (तालुका प्रतिनिधी)