मोहन राऊत ।आॅनलाईन लोकमतधामणगाव रेल्वे : ध्येय निश्चित केल्यानंतर जिद्द, चिकाटी व परिश्रमाने आकाशालाही गवसनी घालणे शक्य असल्याचे एका शेतमजुराच्या मुलाने सिद्ध केले आहे. विपरीत परिस्थितीतही इंडियन आर्मीत निवड झाल्याने या शेतमजूरपुत्राचा जळगाव आर्वीतील ग्रामस्थांना अभिमान आहे़तालुक्यातील दीड हजार लोकवस्तीचे संत लहरीबाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जळगाव आर्वी येथील शेतमजुराचा मुलगा स्वप्नील संजय क्षीरसागर (२३) इंडियन आर्मीत दाखल झाला. त्यांच्याकडे शेती नसल्याने उदरनिर्वाहासाठी आई-वडील शेतमजुरी करतात. स्वप्नीलने दररोज घरी असलेल्या दोन म्हशीचे दूध धामणगावात वितरित करून बी़ए़पर्यंत शिक्षण घेतले. आई गृहिणी, तर वडील शेतमजूर असल्याने परिस्थितीचा सामना करण्यासाठी स्वप्निल दररोज रात्री ४ ते ५ तास अभ्यास व सकाळी व्यायाम करून आपले ध्येय त्याने पूर्ण केले़शांत व संयमी स्वभाव असलेल्या स्वप्नीलने आर्थिक परिस्थिती कधीही लपविली नाही. शहरातील संदीप सायरे या कोचिंग क्लासचे मार्गदर्शन घेत त्याने आपले शिक्षण पूर्ण केले़ प्रथमत: शारीरिक परीक्षा पुणे येथे देऊन यात अव्वल शंभरपैकी पूर्ण गुण घेतले, तर नागपूर येथे झालेल्या लेखी परीक्षेत ८० गुण मिळविले़ आर्थिक पाठबळ नाही, घरात उच्च शिक्षित कुणीही नसताना स्वप्नील क्षीरसागर याने मिळविलेल्या यशाचा व देशसेवेसाठी इंडियन आर्मीत सहभागी झाल्याचा अभिमान जळगाव आर्वी येथील ग्रामस्थांच्या चेहºयावर झळकत आहे़ येथील माजी खा़विजय मुडे, सरपंच सोनाली धीरज मुडे, उपसरपंच संदीप भोगे, बाजार समितीचे माजी संचालक धीरज मुडे, संदीप सायरे, अशोक क्षीरसागर यांनी स्वप्नीलचे कौतुक केले़ जिद्द व परिश्रम आणी डोक्यात काही तरी करण्याची जिद्द असल्यास कोणत्याही क्षेत्रात माणूस यशस्वी होऊ शकतो, हे स्वप्नीलने समाजाला दाखवून दिले़
शेतमजुराच्या मुलाची सैन्यदलात निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 10:59 PM
ध्येय निश्चित केल्यानंतर जिद्द, चिकाटी व परिश्रमाने आकाशालाही गवसनी घालणे शक्य असल्याचे एका शेतमजुराच्या मुलाने सिद्ध केले आहे.
ठळक मुद्देजिद्द, परिश्रम ठरले यशस्वी : जळगाव आर्वीकरांना अभिमान