आॅनलाईन लोकमतअमरावती : मार्च २०१७ मध्ये महापालिकेची सत्तेची चावी हाती घेतल्यानंतर भाजपने स्थायी समितीवरही मोहोर उमटविली. १६ सदस्यीय स्थायीमध्ये भाजपने नऊ सदस्य धाडत सभापतिपद पटकावले. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा स्थायीसाठी भाजपजनांनी कंबर कसली आहे. स्थायीमध्ये सदस्य म्हणून आपली वर्णी लागावी आणि झालेच तर सभापतिपद पटकवायचे, यासाठी अंतर्गत राजकारणाने वेग घेतला आहे. दरम्यान, तुषार भारतीय यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ‘विवेक’शून्य नगरसेवकाकडे हे महत्त्वाचे पद देऊ नये, यासाठी पक्षपातळीवर जोरदार फिल्डिंग लावण्यात आली आहे.विद्यमान स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांचा कार्यकाळ १६ मार्च २०१८ रोजी संपत आहे. त्यापूर्वी १६ सदस्य अस्थायीमधील आठ सदस्य निवृत्त होतील. अर्थात १६ चिठ्ठ्या टाकून त्यातील आठ सदस्य बाद होतील. त्यानंतर फेब्रुवारीच्या आमसभेत स्थायीसाठी आठ सदस्यांची नावे आल्यानंतर आमसभेत त्या नावाची घोषणा केली जाईल. जुने आठ व नव्याने सदस्य म्हणून स्थायीत प्रवेशलेल्या १६ पैकी भाजपच्याच स्थायी सदस्यांपैकी एकावर स्थायी सभापती म्हणून शिक्कामोर्तब होईल. त्यादृष्टीने भाजपसह काँग्रेस, शिवसेना, बसपा, एमआयएममध्ये राजकारण सुरू झाले आहे. ४९ संख्याबळ असलेल्या भाजपमध्ये स्थायी समिती सदस्य व सभापती पदांसाठी चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. यानिमित्त आपापल्या गॉडफादरकरवी फिल्डिंग लावली जात आहे.स्थायी सभापती आमदारांच्या गटाकडेभाजप कितीही नाकारत असले तरी महापालिकेतील नगरसेवक आ. सुनील देशमुख व स्थायी सभापती तुषार भारतीय यांच्या गोटात विभागले गेले आहेत. महापौर संजय नरवणे यांच्यावर आ. देशमुख गटाचा शिक्का लागल्याने पुढील स्थायी सभापतिपद याच गोटाला मिळणार असल्याची शक्यता महापालिका वर्तुळात व्यक्त होत आहे.
‘तिजोरीचे पहारेकरी’ होण्यासाठी चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:25 AM
मार्च २०१७ मध्ये महापालिकेची सत्तेची चावी हाती घेतल्यानंतर भाजपने स्थायी समितीवरही मोहोर उमटविली.
ठळक मुद्देफेब्रुवारीच्या आमसभेत नव्या सदस्यांची निवड : अ‘विवेका'ने पदाची प्रतिष्ठा धोक्यात, हुकणार नंबर