शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
2
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
5
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
6
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
7
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
8
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
10
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
12
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
14
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
15
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
16
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
17
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
19
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
20
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...

परिपत्रक निघाले, पण समितीचे काय?

By admin | Published: January 23, 2015 12:41 AM

शासनाचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शैक्षणिक संस्था, शाळांमध्ये महिला तक्रार निवारण समिती स्थापन करण्याविषयी परिपत्रक काढले.

अमरावती : शासनाचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शैक्षणिक संस्था, शाळांमध्ये महिला तक्रार निवारण समिती स्थापन करण्याविषयी परिपत्रक काढले. परंतु ही समिती कशी तयार करायची, त्यामध्ये सदस्यत्व कोणाला द्यायचे याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे शाळांना सूचना देऊन समितीविषयी काय सांगावे, असा प्रश्न शिक्षण विभागाला पडला आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी व उपाययोजना सुचविण्याबाबत निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली होती. त्या समितीने अंतिम अहवाल सादर केला. या अहवालानुसार प्रत्येक शाळेत महिला तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात यावा. तसेच न्यायालय स्तर, गावपातळी, शाळा, महाविद्यालय स्तर, औद्योगिक आस्थापनेमध्ये महिलांकरिता तक्रार निवारण समिती स्थापन करणे या शिफारसी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था, अध्यापक विद्यालये, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये महिला तक्रार निवारण समिती स्थापन करण्याचे परिपत्रक राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्यावतीने नुकतेच काढण्यात आले. यामध्ये निवृत्त न्यायमूर्ती धर्माधिकारी यांच्या शिफारसीप्रमाणे प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांना काही सूचना करण्यात आल्या आहेत. शाळांमध्ये महिला तक्रार निवारण कक्ष स्थापन करणे, याविषयी पाठपुरावा करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामध्ये सविस्तर अशी माहिती देण्यात आलेली नाही.शाळांमध्ये महिला तक्रार निवारण कक्ष स्थापन करायचा झाल्यास तो कसा असेल, समितीचे अध्यक्ष कोण असेल, सचिव व सदस्य कोण राहील, कोणत्या क्षेत्रामधील सदस्यांचा समावेश करावा, असा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे शिक्षण विभागाला परिपत्रक मिळाले तरी महिला तक्रार निवारण कक्ष स्थापन करताना अनेक अडचणी येत आहेत. यासाठी संबंधित विभागाने समिती स्थापनेविषयी मार्गदर्शक तत्त्वांची माहिती देणे महत्त्वाचे आहे. (प्रतिनिधी)