शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

रात्री ११ वाजता शहर बंद; पोलीस आयुक्तांचा निर्णय

By admin | Published: June 09, 2016 12:19 AM

शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी रात्री ११ वाजतानंतर बार, हॉटेल, रेस्टॉरेंट व हातगाड्या बंद करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्यात.

अमरावती : शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी रात्री ११ वाजतानंतर बार, हॉटेल, रेस्टॉरेंट व हातगाड्या बंद करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्यात. ११ वाजतानंतर हे व्यवसाय सुरु दिसल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. मंगळवारी रात्री पोलीस आयुक्तांनी गाडगेनगर ठाण्याच्या क्षेत्रात पेट्रोलिंग केली. त्यामध्ये एका बिअरबारवर कारवाई करण्यात आली आहे. शहरातील बहुतांश व्यापारी रात्री १० वाजतापर्यंत व्यापारी प्रतिष्ठाने बंद करतात. मात्र, काही ठिकाणी फुटपाथवर चायनिज, चाटभंडार व अंडीविक्रीच्या हातगाड्या सुरूच असतात. काही ठिकाणी रात्री बार व रेस्टॉरेंट देखील सुरु राहात असल्याचे निदर्शनास येत आहे. रात्रीच्या वेळी गुन्हेगारी प्रवृत्तीचे तत्व सक्रिय असतात. ते गुन्हा करण्यापूर्वी धाबे, बार, हातगाड्या व हॉटेलमध्ये आश्रय घेतात. ही बाब पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आली आहे. त्या अनुशंगाने पोलीस आयुक्त मंडलिक यांनी या सूचना दिल्या आहेत. मंगळवारी स्वत: पोलीस आयुक्तांनी गाडगेनगर हद्दीत पेट्रोलिंग केले. त्यांच्यासोबत पोलीस उपायुक्त मोरेश्वर आत्राम व सहायक पोलीस आयुक्त रियाजुद्दीन देशमुख सुध्दा होते. या दरम्यान त्यांनी एका बिअरबारवर कारवाई केली असून तो अहवाल उत्पादन शुल्क विभागाला पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत.