पालकमंत्री प्रवीण पोटे : विकासकामांची पाहणीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा न्यायालय, न्याय सहायक वैद्यकीय प्रयोगशाळा यांच्या अद्ययावत सुविधा असलेल्या प्रशस्त इमारती शहरात आकारास आल्यात. शहरातील उड्डाणपूल, रस्ते आदी विकासकामेही लवकरच पूर्ण होतील. या उत्कृष्ट नागरी सुविधांमुळे अमरावती शहर राज्यात अव्वल ठरेल, असा विश्वास पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सोमवारी येथे व्यक्त केला. शहरात उभारण्यात आलेल्या जिल्हा न्यायालय, न्याय सहायक वैद्यकीय प्रयोगशाळा, सुपर स्पेशालिटी रुग्णालय आदी इमारती, राजापेठ उड्डाणपूल, बेलोरा विमानतळ आदी विविध विकासकामे व प्रकल्पांची पालकमंत्र्यांनी पाहणी केली. यावेळी खा. आनंदराव अडसूळ, महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले, स्थायी समितीचे सभापती तुषार भारतीय, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, महापालिका आयुक्त हेमंतकुमार पवार आदी उपस्थित होते.शहरात सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ज्या-ज्या विभागांच्या नव्याने इमारती उभारल्या जात आहेत, त्या विभागांच्या अधिका-यांच्या संकल्पना जाणून घेऊन इमारतींना आकार देण्यात येत आहे. ही सर्व कामे गतीने पूर्ण करण्यावर भर दिला जात असल्याचे ते म्हणाले.विमानतळावरील एअर स्ट्रीपची लांबी १८०० मीटरहून २२०० मीटरपर्यंत वाढविल्यास मोठी विमानेही उतरू शकतील. त्यामुळे केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे ना. पोटे यांनी सांगितले. मागणीच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही खा.अडसूळ यांनी दिली.जिल्हा क्रीडा संकुलजिल्हा क्रीडा संकुलासाठी प्रस्तावित ७ एकर जागेची पाहणीही पालकमंत्र्यांनी केली. या ठिकाणी आर्चरी रेंज, बॅडमिंटन, ज्युडो हॉल, तरणतलाव आदी सुविधा उभारण्यात येणार आहेत. या जागेची तत्काळ मोजणी करून घ्यावी व कामाला गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी यावेळी प्रशासनाला दिले.महापालिकेसाठी नवीन इमारतयावेळी पालकमंत्र्यांनी महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी प्रस्तावित जागेची पाहणी केली. ही जागा तपोवन परिसरात महामार्गालगत असून लवकरच हे काम मार्गी लावण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या विषयावर चर्चा झाली आहे, असे ना.पोटे यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी महापालिकेने निधीची तरतूद केली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी दिली.
नागरी सुविधेत शहर आघाडीवर
By admin | Published: June 27, 2017 12:10 AM