शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

‘मिस्ड कॉल सिटिझन फीडबॅक’मध्ये शहर शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 10:40 PM

राज्यातील छोट्या नगरपरिषदा स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल येण्यासाठी धडपडत आहेत व त्यासाठी व्यापक जनजागृतीवर भर देत असताना अमरावती शहर मात्र त्यात माघारले आहे.

ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षण : व्यापक जनजागृतीची आवश्यकता

आॅनलाईन लोकमतअमरावती : राज्यातील छोट्या नगरपरिषदा स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल येण्यासाठी धडपडत आहेत व त्यासाठी व्यापक जनजागृतीवर भर देत असताना अमरावती शहर मात्र त्यात माघारले आहे. १४ हजारांपेक्षा अधिक स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करून त्यात समाधान मानणारे अमरावती शहर ‘मिसकॉल सिटिझन फिडबॅक’ या घटकात माघारले आहे. ४ हजार गुणांच्या स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या अनुषंगाने ‘नागरिकांच्या प्रतिक्रिया या घटकासाठी १४०० गुण आहेत. त्यापैकी १०० गुण ‘मिसकॉल सिटिझन फिडबॅक ’वर अवलंबून आहेत. मात्र या आघाडीवर अमरावती शहर व पर्यायाने महापालिका प्रशासनात सामसूम आहे. १९६९ या टोल फ्री क्रमांकावर मिसकॉल देऊन नागरिकांना त्यांच्या प्रतिक्रिया द्यावयाच्या आहेत.देशातील ४,०४१ शहरांमध्ये ४ जानेवारीपासून स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या महत्त्वाकांक्षी सर्वेक्षणास सुरुवात झाली आहे. ४ हजार गुणांच्या या परीक्षेत सेवास्तरावरील प्रगती व नागरिकांच्या प्रतिक्रियांसाठी प्रत्येकी १४०० व प्रत्यक्ष निरीक्षणाकरिता १२०० गुण आहेत. स्वच्छ सर्वेक्षणास सामोरे जात असताना शहराच्या गुणांकनाची मदार ‘सिटिझन फिडबॅकवर’ अवलंबून आहे. स्वच्छ सर्वेक्षणादरम्यान क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडियाचे असेसर्स नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊन शहराचे गुणांकन ठरविणार आहेत. त्यासोबतच संबंधित शहरातील नागरिकांनी १९६९ या टोल फ्री क्रमांकावर मिसकॉल देऊन स्वच्छ सर्वेक्षण व शहर स्वच्छतेबाबत त्यांचे मत द्यावयाचे आहेत. त्यात अमरावती शहरातील नागरिकांनी अद्यापपर्र्यंत कुठलीही प्रतिक्रिया नोंदविलेली नाही. स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांचाही सहभाग वाढावा, तसेच नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटावे, या हेतूने १९६९ हा टोल फ्री क्रमांक सुत्रू करण्यात आला आहे. या क्रमांकावर मिसकॉल देऊन, शिवाय संकेतस्थळाच्या माध्यमातून नागरिकांना त्यांचे मत नोंदविणे शक्य आहे. १९६९ या टोल फ्री क्रममांकावर कॉल केला असता लवकरच आपले मत नोंदवून घेतले जाईल, असा संदेश दिला जातो. त्यानंतर ५ ते १० मिनिटांमध्ये मिसकॉल देणाºयाच्या भ्रमणध्वनीवर परत कॉल येऊन सहा प्रश्न विचारले जातात. स्वच्छ भारत अभियानाच्या अनुषंगाने घेण्यात येत असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचा मिसकॉल सिटिझन फिडबॅक हा एक घटक आहे. शनिवारी अमरावती शहराचा या घटकाअंतर्गत असलेल्या बाबीमध्ये कुठलाही उल्लेख नव्हता. त्यामुळे क्युसीआयचे पथक स्वच्छ सर्वेक्षणासाठी शहरात येण्यापूर्वी अमरावती शहराला ‘मिसकॉल सिटिझन फिडबॅक’मध्ये स्थान नोंदवून संधीचे सोने करण्याची संधी आहे.स्वच्छता अ‍ॅपमध्ये ३५ वे रँकिंगस्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करून त्यावर आलेल्या समस्यांचे निराकरण या घटकांमध्ये अमरावती शहर ३५ व्या क्रमांकावर आहे. १ ते १० लाख लोकसंख्येच्या ३६९ शहरांमधील हे स्थान आहे. अमरावती महापालिकेने आतापर्यंत १४,३९४ स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करण्यात यश मिळविले आहे. पालिकेला २०११ च्या लोकसंख्येच्या तुलनेत १३ हजार अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे उद्दिष्ट होते. ते लक्ष्य महापालिकेने पूर्ण केले आहे. आता १९६९ या टोल फ्री क्रमांकावर मिसकॉल देऊन प्रतिक्रिया नोंदविण्याचा रतिब घातल्यास गुणांकनात भर पडणार आहे.