शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

एलबीटी वसुलीसाठी ‘सिटीलॅन्ड’ ‘बिझिलॅन्ड’ लक्ष्य

By admin | Published: March 26, 2015 12:03 AM

स्थानिक संस्था कर (एलबीटी) वसुलीसाठी महापालिका सीमेबाहेरील ‘सिटीलॅन्ड’ आणि ‘बिझिलॅन्ड’ या संकुलांना लक्ष्य करण्यात आले आहे.

अमरावती : स्थानिक संस्था कर (एलबीटी) वसुलीसाठी महापालिका सीमेबाहेरील ‘सिटीलॅन्ड’ आणि ‘बिझिलॅन्ड’ या संकुलांना लक्ष्य करण्यात आले आहे. याच श्रृंखलेत बुधवारी नागपूर महामार्र्गावरील बोरगाव स्थित ‘सिटीलॅन्ड’ नामक संकुलातील गणेश होजीअरी या रेडिमेड कापड दुकानाला टाळे लावण्याची कारवाई करण्यात आली.महापालिकेत १ जुलै २०१२ पासून एलबीटी सुरु करण्यात आला. मात्र एलबीटीतून सुटका मिळावी, यासाठी व्यापाऱ्यांनी महापालिका सीमेबाहेर प्रतिष्ठाने थाटली आहेत. नागपूर महामार्गावर ‘सिटीलॅन्ड’ आणि ‘बिझिलॅन्ड’ संकुल साकारले आहे. कापड व्यवसायाशी निगडित व्यापाऱ्यांनी एलबीटी वाचविण्यासाठी शहरातील दुकाने सीमेबाहेर नेलीत. परंतु एलबीटीचा भरणा करण्यास व्यापाऱ्यांनी पुढाकार घेतला नाही. नोंदणी अथवा कर न भरता दुकाने बाहेर नेली. त्यामुळे दुकानांची यादी ही एलबीटी विभागात कायम आहे. दरम्यान कर मूल्यांकन सुरु झाले असता बऱ्याच दुकानांवर एलबीटी थकीत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे एलबीटी विभागाने प्रतिष्ठानच्या संचालकांना २०१२ ते २०१४ या आर्थिक वर्षांचे कर मूल्याकंनासाठी वारंवार नोटीस बजावल्यात. परंतु व्यावसायिकांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे बोरगाव स्थित गणेश होजीअरी या दुकानाला टाळे लावण्याची कारवाई करण्यात आली. ही कारवाई उपायुक्त विनायक औगड यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त योगेश पिठे, एलबीटी अधीक्षक सुनील पकडे यांनी केली आहे. मार्च अखेरपर्यत एलबीटी वसुलीसाठी व्यापारी संकुलावर छापे टाकून एलबीटी बुडविणाऱ्याना टाळे लावण्याची कारवाई सुरुच राहील. एलबीटीचा भरणा करुन व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त अरुण डोंगरे यांनी केले आहे.