आॅनलाईन लोकमतदर्यापूर : बाभळी येथील लहान पुलानजीक चंद्रभागा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात घाण झाली होती. विविध वृक्षसुद्धा वाढले. अनेकदा निवेदन देऊनही प्रशासनाने सहकार्य न केल्याने अखेर नागरिकांनीच मंगळवारी नदीपात्रात उतरून स्वच्छता केली. यामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग होता.चंद्रभागेला येथे मोठा डोह आहे. या ठिकाणी बारोमास पाणी राहते. पोहण्याच्या आकर्षणातून अनेकांना या ठिकाणी प्राण गमवावे लागले. नदीपात्र स्वच्छ न केल्याने पावसाळयात बाभळीच्या वस्तीत पाणी शिरण्याचीही भीतीदेखील असते. आहना वेलफेअर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी नदीपात्राच्या स्वच्छतेसाठी लोकांना आवाहन केले होते. नागरिक या आवाहनाला प्रतिसाद देत नदीपात्रात उतरले आणि प्रवाह अडविणारा घनकचरा व घाण साफ केली. जेसीबीने खोदून १५ ते २० ट्रॅक्टरने माती व साचलेली घाण या ठिकाणावरून दूर नेण्यात आली. आली. सकाळी ८ पासून दुपारी ४ वाजेपर्यंत हे अभियान सतत सुरू होते. बनोसा, दर्यापूर व इतर ठिकाणावरून नागरिक व सामाजिक कार्यकर्ते या कार्यात सहभागी झाले होते. यामध्ये नवनीत राणा यांच्यासह अर्चना चांदूरकर, विमल लंगडे, अनिता गायकवाड, प्रिया येळणे, सीमा धोत्रे, रत्ना ठुसे, नलू धोत्रे, सोळंके, संगीता माहुरे, लक्ष्मी शिरभाते, गोदावरी भागवतकर, कृष्णा मुळे, दया गुल्हाने यांच्यासह आहना वेलफेअर सोसायटीचे जयस्वाल, प्रदीप मलिये, नाना माहुरे तसेच भाजपा युवा मोर्चाचे पप्पू राखोंडे, सागर वडतकर, अनेक सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
चंद्रभागा नदीपात्राची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 10:07 PM
बाभळी येथील लहान पुलानजीक चंद्रभागा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात घाण झाली होती. विविध वृक्षसुद्धा वाढले. अनेकदा निवेदन देऊनही प्रशासनाने सहकार्य न केल्याने अखेर नागरिकांनीच मंगळवारी नदीपात्रात उतरून स्वच्छता केली. यामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग होता.
ठळक मुद्दे२० ट्रॅक्टर काढला कचरा : महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग