आॅनलाईन लोकमतअंजनगाव सुर्जी : येथील वर्षानुवर्षांपासून घाण व दुर्गंधीने मलीन असलेले शहराव्याप्त शहानूर नदीपात्रात लोकजागरातून स्वच्छतेची क्रांती झाल्याचा जनकल्याणी प्रयोग अंजनगावात यशस्वी झाला असून, लोकजागर संघटनेने सुरुवात केलेल्या या कामाकडे चळवळीचे स्वरुप प्राप्त झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथीला २० डिसेंबर रोजी सुरुवात झाली. या कामाला आज बाबांच्या जयंतीदिनी लोक चळवळीचे स्वरुप निर्माण झाले होते. लोकजागर, ग्राम पंचायत, पंतजली योग समिती, नगर परिषद, तहसील कार्यालय या संघटनांच्या कर्मचारी, कार्यकर्त्यांसह सीताबाई संगई ज्ञानपीठ, नगर परिषद प्रागतिक अशा विविध विद्यालयातील विद्यार्थी व शहरातील नागरिक अशा सुमारे तीन हजार हातांनी नदीपात्र स्वच्छतेचा कार्यक्रम राबविला. सुमारे दीड किलोमीटरपर्यंत नदीपात्रातील घाणीने माखलेले नदीपात्र क्लीन झाले.१३ डिसेंबर ते २० डिसेंबर या सप्ताहात दररोज नदीपात्राची स्वच्छता झाली. पाच जेसीबीद्वारे नदीपात्र सपाट करण्यात आले. शेकडो क्विंटल कचरा व प्लास्टिक वेचून सफाई करण्यात आली. काठीपुरा येथील गाडगेबाबांच्या मूर्तीचे पूजन करुन लोकजागर संघटना, ग्राम पंचायत , नगर परिषद, तहसील कार्यालय, पंतजली योग समिति, सीताबाई संगई शाळा, ज्ञानपीठ कॉन्व्हेंट, प्रागतिक विद्यालय नगर पालिकेच्या मराठी व उर्दू शाळांच्या विद्यार्थीसह शहरातील नागरिकांचा यात सहभाग होता. आज पावतो ५०० ग्रास जेसीबीचे काम नदीपात्रात झाले असून पालिकेच्या वतीने एक जेसीबी यासाठी पुरविण्यात आला होता. सुमारे १० ट्रॉॅली प्लास्टिक या नदीपात्रातून काढण्यात आले असून अडीच लाख रुपयांच्या लोकवर्गणीतून हा खर्च करण्यात आली असल्याची माहिती आहे.
लोकजागरातून झाली शहानूर स्वच्छतेची क्रांती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 10:04 PM
येथील वर्षानुवर्षांपासून घाण व दुर्गंधीने मलीन असलेले शहराव्याप्त शहानूर नदीपात्रात लोकजागरातून स्वच्छतेची क्रांती झाल्याचा जनकल्याणी प्रयोग अंजनगावात यशस्वी झाला असून, लोकजागर संघटनेने सुरुवात केलेल्या या कामाकडे चळवळीचे स्वरुप प्राप्त झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
ठळक मुद्देसंत गाडगेबाबांच्या जयंतीला दीड हजार लोक नदीपात्रात : शहरालगत दीड किलोमीटर परिसराची सफाई