लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र शासनातर्फे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत एक देशव्यापी सर्वेक्षणातून घेण्यात आले आहे. या सर्वेक्षणात ग्रामीण भागाचे सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षण अंतर्गत ग्रामस्थांनी एसएसजी १८ हे मोबाइल अॅप डाऊनलोड करून त्यावर आपली स्वच्छतेबाबतची मते व्यक्त करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. १ ते ३१ आॅगस्ट दरम्यान देशभरात एकाच वेळी हे सर्वेक्षण होणार आहे. जिल्ह्यातील ग्रामस्थांनीसुद्धा या अॅपवर आपली मते व्यक्त करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने देशव्यापी सर्वेक्षणाचा कार्यक्रम सुरू झाला आहे. या सर्वेक्षणात जिल्ह्यातील सर्व गावांतील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता निरीक्षण, ग्रामस्थांची स्वच्छताविषयक आॅनलाइन अभिप्राय आणि स्वच्छताविषयक सद्यस्थिती या तीन मानकांच्या आधारे स्वतंत्र संस्थेमार्फत स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाचा प्रमुख भाग म्हणजे, यातून निघणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे संपूर्ण भारतातील जिल्ह्याचे आणि राज्याचे स्वच्छता आणि क्रमवारी निश्चित होणार आहे.एसएसजी १८ मोबाइल अॅपवर जिल्ह्यातील जास्तीत जास्त प्रतिक्रिया नोंदवण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थ तसेच तालुका व जिल्हा परिषदेच्या सर्व आस्थापनेवरील सर्व अधिकारी-कर्मचारी मुख्याध्यापक व शिक्षकवृंद, स्थानिक स्तरावरील तसेच महाविद्यालयस्तरावर युवक मंडळ, बचतगट यांनी प्रतिक्रिया नोंदवावी तसेच आपले गाव, ग्रामपंचायत स्वच्छ सुंदर करण्याच्या प्रयत्नात सर्वांगाने झोकून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या उपक्रमात मोठा लोकसहभाग अपेक्षित आहे.मागविण्यात येणाऱ्या प्रतिक्रियास्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ बद्दल माहिती आहे का ?एसबीएम अंमलबजावणीसह तुमच्या गावातील सर्वसाधारण स्वच्छतेत किती सुधारणा झालेली आहे?घनकचऱ्याच्या सुरक्षित विल्हेवाटीसाठी गावपातळीवर व्यवस्था केली गेली आहे का?ओला कचरा साठी दूषित पाण्यासाठी गावपातळीवर व्यवस्था आहे?अॅपचा आग्रह का?आजही जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रस्ते, वीज या समस्या कायम आहेत. अनेक ठिकाणी आजही दूरध्वनी व इंटरनेट अनेकांजवळ साधे मोबाइल असून, त्याची इंटरनेट सुविधा नाही. अशा भागातील नागरिक खरच हे अॅप डाऊनलोड करतील का व त्यावर खरोखर सर्वेक्षण करू शकतील का, असा प्रश्न आहे.
ग्रामीण भागात अॅपने स्वच्छता सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 10:15 PM
केंद्र शासनातर्फे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत एक देशव्यापी सर्वेक्षणातून घेण्यात आले आहे. या सर्वेक्षणात ग्रामीण भागाचे सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षण अंतर्गत ग्रामस्थांनी एसएसजी १८ हे मोबाइल अॅप डाऊनलोड करून त्यावर आपली स्वच्छतेबाबतची मते व्यक्त करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. १ ते ३१ आॅगस्ट दरम्यान देशभरात एकाच वेळी हे सर्वेक्षण होणार आहे.
ठळक मुद्दे३० आॅगस्टपर्यंत मुदत : ग्रामस्थांना नोंदवावी लागणार प्रतिक्रिया