नरेंद्र जावरेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अचलपूर तालुक्यातील रासेगाव येथे एका शेतात निघालेल्या अजगराला तेथील टवाळखोरांना दगड काठ्यांनी ठेचून ठार केले. त्यानंतर एका झाडाला टांगून दिल्याची घटना घडली. परतवाडा येथून पकडण्यास गेलेल्या सर्पमित्रांना सदर प्रकार दिसताच संताप व्यक्त करीत हळहळ करीत परत आले. रासेगाव येथील एका शेतात अंदाजे १२ फूट लांबीचा अजगर निघाल्याची माहिती दूरध्वनीवर परतवाडा येथील सर्पमित्र मोनी इर्शीद यांना एका अज्ञात इसमाने दिली. त्यावरून त्या अजगरावर केवळ लक्ष ठेवा तुम्ही काहीच करू नका, असा सल्ला दिला आणि लगेच आपले सहकारी मोनू जयस्वाल, शुभम गुप्ता, प्रदीप आमझरे यांना घेऊन मोनी इर्शीद यांनी रासेगाव गाठले. तेथील काही नागरिकांना विचारणा केली असता, कुणी सांगण्याचे धाडस करीत नव्हता. शोध घेतला असता एका झाडावर त्या अजगराला ठेचून मारून नायलॉनच्या दोरीने झाडावर टांगून देण्यात आले होते, हा संतापजनक प्रकार पाहता सर्पमित्रांनी या टवाळखोरांना खडेबोल सुनावले आणि झाडावरून अजगराला खाली आणून त्याचा दफनविधी करण्याची विनंती करत निघून आले.ससा गिळल्याने होता सुस्तअजगराने ससा गिळल्याची चर्चा संपूर्ण रासेगावात पसरली. त्यामुळे त्या शेताजवळ गावातीलच टवाळखोर मुलेही आली. परतवाडा येथील सर्पमित्रांना बोलावल्याची माहिती दिल्यावरही कुठलीच तमा न बाळगता दगड काठ्यांनी १२ फूट लांबीचा अजगर ठेचून काढला. अजगराने सशाची शिकार केली असताना पोटावरच काठ्यांचा मार बसल्याने अजगराचा मृत्यू झाला. त्याला एका झाडावर टांगून ठेवल्याच्या घटनेचा सर्पमित्रांमध्ये संताप होत आहे. या सर्पमित्रांनी परिसरात कुठेही साप निघाल्यास त्याला न मारता संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
अमरावती जिल्ह्यातील रासेगावात निर्दयतेचा कळस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 12:28 PM
अचलपूर तालुक्यातील रासेगाव येथे एका शेतात निघालेल्या अजगराला तेथील टवाळखोरांना दगड काठ्यांनी ठेचून ठार केले. त्यानंतर एका झाडाला टांगून दिल्याची घटना घडली.
ठळक मुद्दे बारा फुटांच्या अजगराला मारून झाडावर टांगलेसर्पमित्र हळहळले