निवेदन : भाजयुमोची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी अमरावती : खासगी शिकवणीवर्ग बंद करण्यात यावेत व शाळेतच दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करावे, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाद्वारे उच्चशिक्षणमंत्री विनोद तावडे यांना सोमवारी देण्यात आले. राज्यातील हजारो गरगरीब विद्यार्थ्यांना खासगी शिकवणी शुल्क परवडत नाही. त्यामुळे त्यांना दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहावे लागते. शिक्षणाचा हा बाजार रोखून शाळा-महाविद्यालयांतच विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण देण्याची सोय करावी. ते शिक्षण दर्जेदार असावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. शाळेतच विद्यार्थ्यांकडून अभियांत्रिकी आणि वैद्यकीय पूर्व परीक्षांचा अभ्यास करून घ्यावा, अशी मागणी ना. तावडे यांना भाजयुमोचे सोपान कनेरकर, धम्मराज नवले, ऋषीकेश चांगोले, पंकज ठाकरे, भावना खवले आदींनी केली.
खासगी शिकवणी वर्ग बंद करा
By admin | Published: November 04, 2015 12:16 AM