शहरं
Join us  
Trending Stories
1
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
2
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
3
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
4
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
5
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
6
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
7
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
8
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
9
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
10
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
11
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
13
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
14
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
15
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
16
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
17
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
18
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

आज शहर बंद

By admin | Published: February 27, 2017 12:05 AM

ईव्हीएम घोळाचा वणवा अमरावतीतही पोहोचला असून फेरमतदानाच्या मागणीसाठी शिवसेनेसह बहुपक्षिय पराभूत उमेदवारांनी सोमवार २७ फेब्रुवारीला ‘अमरावती बंद’ची हाक दिली आहे.

सर्वपक्षीय एकवटले : फेरमतदानाची मागणी बुलंदअमरावती : ईव्हीएम घोळाचा वणवा अमरावतीतही पोहोचला असून फेरमतदानाच्या मागणीसाठी शिवसेनेसह बहुपक्षिय पराभूत उमेदवारांनी सोमवार २७ फेब्रुवारीला ‘अमरावती बंद’ची हाक दिली आहे. सत्ताधिशांकडून घालण्यात आलेला मतदान यंत्रातील घोळ लोकशाहीची हत्या करण्याचा प्रकार असून त्याविरोधात पुकारलेल्या शहर बंदला व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे ,असे आवाहन खा. आनंदराव अडसूळ यांनी केले. रविवारी शिवसेना संपर्क कार्यालयात अडसूळ यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. भाजपक्षाने या ईव्हिएम सेट केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सोमवारी सकाळी ८ ते ११ या कालावधीत शहर बंद केल्यानंतर नेहरु मैदानातून जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढल्या जाईल.या मोर्चात सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांसह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, मुस्लिम लिग व अन्य पक्षाचे पदाधिकारी, अपक्ष काळे झेंडे घेऊन सहभागी होतील.बंद आणि मोर्चाच्या माध्यमातून फेरमतदानाची मागणी बुलंद करण्यात येणार आहे.शनिवारी संत गाडगेबाबा समाधीमंदीरात पराभूत उमेदवारांची बैठक झाली.त्यापाठोपाठ रविवारी दुपारी राजकमल चौकस्थित शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात खा.अडसूळ यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.२१ फेब्रुवारीला झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान ईव्हिएममध्ये प्रचंड तांत्रिक घोळ घालण्यात आला. घरची हक्काची मते सुध्दा उमेदवारांना पडली नाहीत. विजयाची शाश्वती असताना काही पराभूत झालेत तर घरी बसलेले उमेदवार अनपेक्षितपणे निवडून आल्याची खंत अनेकांनी या बैठकीत व्यक्त केली. महापालिकेसोबतच जिल्हापरिषद निवडणुकीतही मतदानयंत्रातील कल्पक घोळामुळे अनेकांचा पराभव झाल्याची संतप्त प्रतिक्रिया यावेळी उमटली. महापालिकेच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांसह विद्यमानांना पराभव स्विकारावा लागला. शिवसेनेचे सुधीर सूर्यवंशी वसुनिल खराटे, राष्ट्रवादीचे बाबा राठोड यांच्यासह माजी स्थायी सभापती अविनाश मार्डीकर यांनी ईव्हिएममधील घोळावर प्रकाश टाकला. विशिष्ट उमेदवार निवडून आणण्यासाठी ईव्हिएममध्ये घातलेला घोळ जनतेसमोर आणण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन खा. अडसूळ यांनी केले. संपर्क कार्यालयातील ४०० पेक्षा अधिक उमेदवार पदाधिकाऱ्यांनी त्या आवाहनाला प्रतिसाद दिला. सोमवारच्या बंददरम्यान प्रसंगी पोलिसांशी दोन हात करावे लागतिल, त्यासाठी सर्वानी सज्ज राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. आता न्यायालयीन लढाईनुकत्याच झालेल्या निवडणुकीदरम्यान घालण्यात आलेल्या मतदान यंत्रातील घोळासंदर्भात न्यायालयीन लढाई लढण्याची भूमिका शिवसेनेसह पराभूत उमेदवारांनी घेतली आहे.महापालिका,जिल्हापरिषदेसाठी पुनर्मतदान घेण्यात यावे आणि त्याआधी महापौर आणि सभापती निवडीला स्थगिती देण्यात यावी, असे मुद्दे जनहित याचिकेच्या माध्यमातून मांडले जाणार आहे. यापुढील सर्व निवडणुका पेपर बॅलेटच्या साह्याने घेण्याची विनंती याचिकेतून करण्यात येणार आहे.राष्ट्रपतींकडे याचिका यासंदर्भात राष्ट्रपतींसह राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार करण्याचेही बैठकीदरम्यान ठरविण्यात आले.आपण याबाबत पुढकार घेणार असल्याचे खा. आनंदराव अडसूळ यांनी सांगितले.