लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मराठ्यांचे ५८ मोर्चे झालेत; मात्र शासनाला जाग आली नाही. मराठा आरक्षणाला कलाटणी देण्याचे काम शासनाने केले. आता मूक नाही, तर ठोक मोर्चा या शासनाला धडा शिकवेल. गनिमी काव्याने ९ आॅगस्टला आंदोलनाचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.१४ युवकांना श्रद्धांजलीअमरावती : या सरकारला जेरीस आणून यश पदरात पाडून घेऊ, असा सूर सकल मराठा समाजाच्यावतीने आयोजित गुरुवार सायंकाळच्या बैठकीत निघाला.५८ मोर्चांची परिणती शून्य आहे. मात्र, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी १४ युवकांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. समाज एकवटण्यासाठी कुठले तरी कारण लागते. कोपर्डीच्या घटनेनंतर सकल मराठे एकत्र आलेत व त्यांना हक्कांची जाणीव झाली. अमरावतीचा १३ सप्टेंबरचा मोर्चा अभूतपूर्व होता. यामुळे आपण भावनात्मक झालो व सरकारवरही दबाब निर्माण झाला. मात्र, सरकारद्वारा तारखांचा खेळ सुरू आहे. मराठ्यांना आरक्षण हे शिक्षणासाठी व हक्कांसाठी पाहिजे. इंदिरा साहनी आयोग, न्यायमूर्ती मसे समिती, गायकवाड समिती झाली. मात्र, आयोगाचा अभ्यास सुरू आहे, असे सरकार सांगत आहे. केवळ वेळकाढूपणा सुरू असल्याने आता या असंतोषाला वाट फुटली असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे येत्या ९ आॅगस्टचा बंद कसा असावा, यावर उपस्थितांनी मत प्रदर्शित केले.बैठकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. बैठकीला दोन हजारांवर सकल मराठा बांधव उपस्थित होते.मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर समाजासाठी बलिदान देणाऱ्या काकासाहेब शिंदे, जगन्नाथ सोनवणे, प्रमोद होरे, अभिजित देशमुख, रोहन तोडकर, नंदू बोरसे, संतोष मानघाले, प्रदीप म्हस्के यांच्यासह १४ युवकांना बैठकीच्या सुरुवातीला श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.
अभूतपूर्व राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 1:02 AM
मराठ्यांचे ५८ मोर्चे झालेत; मात्र शासनाला जाग आली नाही. मराठा आरक्षणाला कलाटणी देण्याचे काम शासनाने केले. आता मूक नाही, तर ठोक मोर्चा या शासनाला धडा शिकवेल. गनिमी काव्याने ९ आॅगस्टला आंदोलनाचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.
ठळक मुद्देसकल मराठा एकवटले : गनिमी काव्याने आंदोलनाचा निर्धार