शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
4
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
5
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
6
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
7
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
8
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
9
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
10
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
12
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
13
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
14
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
15
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
16
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
17
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
18
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
19
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...

सीएए, एनआरसी, एनपीआरविरोधात ‘वंचित’चा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 6:00 AM

जिल्हाभरात बंदला संमिश्र प्रतिसाद : उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना ठिकठिकाणी निवेदने, विविध संघटनांचा सहभाग अमरावती : नागरिकत्व दुरुस्ती कायदा एनआरसी ...

जिल्हाभरात बंदला संमिश्र प्रतिसाद : उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना ठिकठिकाणी निवेदने, विविध संघटनांचा सहभागअमरावती : नागरिकत्व दुरुस्ती कायदा एनआरसी विरोधात वंचित बहुजन आघाडीने पुकारलेला बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. यावेळी पोलिसांनी वंचितच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली. अचलपूर, दर्यापूर, धामणगाव, तिवसा, चांदूर रेल्वे, मोर्शी, वरुड, चांदूर बाजार, धारणी येथे तहसीलदार व एसडीओंना निवेदन देण्यात आले. अमरावती तालुक्याच्या मुख्यालयी वंचितच्या मोर्चाला गालबोट लागले.धामणगाव कडकडीत बंदधामणगाव रेल्वे : सीएए, एनपीआर, एनआरसी या कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या भारत बंदला धामणगाव तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. आपत्कालीन व्यवस्था वगळता शैक्षणिक प्रतिष्ठानांसह कडेकोट बंद पाळण्यात आला. तालुक्यातील मुस्लिम बांधवांनीदेखील मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.निवेदन देतेवेळी बहुजन वंचित आघाडीचे अशोक मोहोड, राजेंद्र बोरकर, मुकुंद रंगारी, सरफराज खान, ज्ञानेश्वर शिंगणापुरे, शुभम हेंडवे, मंगेश तायडे, सुभाष डोंगरे, प्रवीण कातळ, संतोष मेश्राम, कैलास डोके, आशिष गावंडे, जीवन बोरकर, सुनील पाटील यांच्यासह शेकडो जण सहभागी झाले.तिवसा येथे सीएएला विरोधतिवसा : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शुक्रवारी तिवस्यात बंद पाळण्यात आला. बंदला तिवसेकर व व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. यात डी.एच. मेश्राम, दीपक सरदार, सागर भवते, सतीश यावले, अनिल सोनोने, राहुल मनवर, प्रवीण निकाळजे, संदीप मकेश्वर, राहुल गोपाळे, बबलू मुंद्रे, भगवान बनसोड, मनोज लांडगे, सागर लांडगे, सम्यक हगवणे, नीलेश गवई, मनीष खरे, दादाराव गडलिंग, गुणवंत ढोणे, भीमराव पाहुणे, रोशन खडसे, नीलेश गवई, निखिल वानखडे, सुदर्शन शापामोहन, दिनेश शेंदरे, राजू शापामोहन, अभिषेक मनोहरे, निखिल आसोडे, भूजंगराव वावरे सहभागी झाले.दर्यापुरात संमिश्र प्रतिसाददर्यापूर : वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या बंदला येथे व्यापक प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व शाळा-महाविद्यालये पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. नगरपालिका इमारतीपासून मोर्चा काढण्यात आला. त्यात साहेबराव वाकपांजर, विजय चौरपगार, अशोक नवलकार, अतुल नळकांडे, सदानंद नागे, संजय चौरपगार, अंकुश वाकपांजर, भीमराव कुºहाडे, जॅकी अहमद, रेखा वाकपांजर, माधुरी चौरपगार, संजीवन खंडारे, संतोष बगाडे, सुमेध खंडारे, अनिरुद्ध वानखडे, धर्मेंद्र आठवले, रुपराव तिडके, चेतन कांबळे, संदीप सुशिर, राजकुमार सावळे आदी सहभागी होते.चांदूर रेल्वे बंदमध्ये ३५ संघटनाचांदूर रेल्वे : सीएए, एनआरसी, एनपीआर कायद्याविरोधात चांदूर रेल्वे शहरात शांततेत पण कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळी १० पासून स्थानिक व्यापाºयांनी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवली. येथील वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, युवक आघाडी व सम्यक विद्यार्थी आघाडीच्यावतीने स्थानिक तहसील कार्यालयासमोर सभा घेण्यात आली. सभेला दादासाहेब घुरडे, चंदू उके, रवींद्र मेंढे, मुकुल परगणे, प्रेमचंद अंबादे, प्रवर्ज्या चवरे, सुरेश गोरडे, अशोक हांडे, सुनील वानखडे, अजय राऊत उपस्थित होते.चांदूरबाजार, वरूड, धारणीमध्ये निवेदनचांदूर बाजार, धारणी व वरूड शहरांत वंचित बहुजन आघाडीमार्फत उपविभागीय अधिकाºयांना निवेदन देण्यात आले. सीएए, एनपीआर, एनआरसीला विरोध दर्शवून ते कायदे मागे घेण्यात यावे, आम्ही कुठल्याही परिस्थितीत कायद्याची अंमलबजावणी होऊ देणार नाही, असा पवित्रा वंचित व सहभागी अन्य संघटनांनी घेतला आहे.अचलपुरात मोर्चापरतवाडा : अचलपूर, परतवाड्यात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सीएए व एनआरसी कायदा रद्द करण्यात यावा, यासाठी शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा गांधीपूल, तहसील, जयस्तंभ चौकमार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहोचला. यावेळी एसडीओ संदीप अपार यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. मोर्चात सतीश इंगोले, अमोल खंडारे, रवी वानखडे, बळवंत गाठे, संजय शिंगाडे, इमरान खान, पुंडलिक वानखडे, गजानन वाकोडे, हाजी मो.इरफान, राहुल कडू, सिद्धार्थ इंगळे, मनीष गवई, अब्दुल राजीक, अक्षय रौराळे, आदी सहभागी होते.

टॅग्स :National Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी