शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
4
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
5
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
6
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
7
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
8
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
9
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
10
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
11
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
12
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
13
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
14
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
15
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
16
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
17
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
18
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
19
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान

ढगाळ वातावरण तुरीला बाधक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 12:08 AM

चार दिवसात व त्यापूर्वी असलेले ढगाळ वातावरण शेंगा धरण्याच्या अवस्थेत असलेल्या तूर पिकाला बाधक आहे.

ठळक मुद्देकीड सर्वेक्षक चमुचा निष्कर्ष : पाने गुंडाळणाऱ्या, शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव

आॅनलाईन लोकमतअमरावती : चार दिवसात व त्यापूर्वी असलेले ढगाळ वातावरण शेंगा धरण्याच्या अवस्थेत असलेल्या तूर पिकाला बाधक आहे. अगोदरच शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला असताना आता पाने गुंडाळणाऱ्या अळीचा वाढता प्रभाव शेतकºयांसमोर नवे संकट उभे करीत आहे.सध्या ‘ओखी’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून वातावरण ढगाळ आहे. साधारणपणे १० डिसेंबरपर्यंत अशीच स्थिती राहणार आहे. या दरम्यान काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील पडण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण, कधी उबदार,कधी थंडी असे वातावरण शेंगा पकडण्याच्या अवस्थेतील तूर पिकाला बाधक, तर अळीला पोषक ठरत आहे. क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत शास्त्रज्ञांनी खरीप पिकांची पाहणी केली. तुरीवर अळींचा प्रादुर्भाव झाल्याचे नित्कर्ष निघाले. तूर पीक शेंगा धरण्याच्या तर काही ठिकाणी पक्वतेच्या अवस्थेत आहे. मात्र, वातावरण बदलाची ही स्थिती आठवडाभर राहिल्यास अळीचा प्रादुर्भावची शक्यता आहे यासाठी शेतकºयांनी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, असे उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती रोडगे, कीड नियंत्रक वैशाली वानखडे, राहुल देशमुख यांनी सांगितले.पिसारी पतंगाचे व्यवस्थापनतुरीवरील पिसारी पतंगाने आर्थिक नुकसानीची पातळी गाठली असेल तर क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही २८ मिली किंवा बिक्टिन बेंझोएट ५ टक्के एसजी ३ ग्रॅम किंवा क्लोरॉनट्रेनीलीप्रोल १८.५ टक्के एससी २.५ मिली प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.शेंग माशीचे व्यवस्थापनशेंग माशीच्या व्यवस्थापनासाठी क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही २८ मिली किंवा डेल्टामेथ्रीन २.८ इसी प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणी करताना एकाच कीटकनाशकाची फवारणी लागोपाठ न करता आलटूनपालटून करावी व स्टीकरचा वापर करावा.असे करा व्यवस्थापनतुरीवर अळीचा प्रादुर्भाव असल्यास ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. अळी प्राथमिक अवस्थेत असल्यास एचएएनपीव्ही प्रतीहेक्टर ५०० रोगग्रस्त अळ्यांचा अर्क फवारावा. फवाºयाची कार्यक्षमता अतीनील किरणातही टिकून राहावी, यासाठी अर्धा लीटर पाण्यात ५० ग्रॅम राणीफॉल टाकून अर्कात मिसळून फवारणी करावी.अधिक प्रादुर्भाव झाल्यास इंडोक्सिकार्ब १४.५ टक्के एस.सी. ६.६ लीटर पाण्यात किंवा स्पिनोसॅड ४५ टक्के इसी किंवा इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के एसजी ४.४ ग्रॅम,किंवा क्लोरॅनट्रेनीलीप्रोल १८.५ टक्के एस.सी.२.५ प्रती १० १० लिटर पाण्यात मिसळून फवारण्याचा असा कृषी विभागाचा सल्ला आहे.