शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
2
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
3
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
4
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
5
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
6
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
7
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
8
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
9
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
10
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
11
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
12
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
13
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
14
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
15
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
16
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
17
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
18
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
19
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
20
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  

ढगाळ वातावरण तुरीला बाधक, शेंगा पोखरणाºया अळीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 11:08 PM

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. अशीच स्थिती आणखी काही दिवस राहण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तविली. त्यामुळे बहरावरील तुरीवर शेंगा पोखरणाºया अळीचा प्रादुर्भाव होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. अशीच स्थिती आणखी काही दिवस राहण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तविली. त्यामुळे बहरावरील तुरीवर शेंगा पोखरणाºया अळीचा प्रादुर्भाव होत आहे. वेळीच व्यवस्थापन न केल्यास मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात यावर्षी १ लाख १० हजार ७०० हेक्टरमध्ये तुरीचे पीक आहे. पेरणीच्या काळात जरी पावसाची तूट राहिली तरी अधूनमधून आलेला पाऊस तुरीच्या वाढीसाठी पोषक ठरला. मागील महिन्यातील अवकाळीने सोयाबीनचे नुकसान झाले, मात्र हा पाऊस तुरीसाठी पोषक ठरला. आता तुरीचे पीक बहरावर, तर काही ठिकाणी शेंगा धरण्याच्या अवस्थेत असताना दोन दिवसांपासूनचे ढगाळ वातावरण तुरीला घातक आहे. अशा वातावरणात तुरीवर मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव होतो. या किडीचे घाटेअळी/हिरवी अमेरीकन अळी/बोंड अळी ( हेलिकोव्हर्पा) असे सामायिक नाव आहे. कोरड्या, उष्ण व दमट वातावरणात अळींचा जास्त प्रादुर्भाव होतो. पीक कळ्या, फुलांवर आल्यापासून शेंगा पोखरणाºया अळींचा मादी पतंग मोठ्या प्रमाणावर अळी घालण्यास सुरुवात करतो. तुरीचे सर्वाधिक नुकसान या अळीमुळे होते. लहान अळी सुरुवातीला कोवळी पाने खाते. फुलोर आल्यावर कळी व फुलांवर अळीचा प्रादुर्भाव होतो. नंतर अळ्या शेंगेतील कोवळे दाणे खातात. अळी शेंगावर अनियमित आकाराचे छिद्र पाडून अर्धी आत व अर्धी बाहेर राहते. एक अळी साधारणपणे २० ते २५ शेंगांचे नुकसान करते. त्यामुळे उत्पादनात दीड क्विंटलपर्यतची कमी येते. यामुळे तुरीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.जिल्ह्यातील हवामानाची सद्यस्थितीजिल्ह्यात १४ नोव्हेंबरपर्यंत धुक्यासह १४ ते १५ अंश सेल्सिअस तापमान राहील. त्यानंतर हिमालयात बर्फवृष्टी होणार आहे. दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र व चक्राकार वारे वाहत आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळेही तापमानात घट होईल. आकाश अंशत: ढगाळ राहण्याचे हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.हे व्यवस्थापनही महत्त्वाचेपहिल्या फवारणीला विलंब झाल्यास व बारीक अळ्या दिसू लागल्यास क्विनॉलफॉस (२० टक्के प्रवाही ) २ मिलि फवारावे. सर्वेक्षणासाठी हेक्टरी १० कामगंध सापळे लावावेत. पक्ष्यांना बसण्यासठी मचान, इंग्रजी टी आकाराचे पक्षिथांबे प्रतिहेक्टर ५० ते ६० उभारावे. शेताच्या बांधावरील अळ्यांचे पर्यायी खाद्य कोळशी, रानभेंडी, पेटारी वेळोवेळी काढून नष्ट करावे.असे करावे व्यवस्थापनपहिली फवारणी- पिकास कळी,फुले येताना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी किंवा कडुनिंबयुक्त कीटकनाशक अ‍ॅक्झाडिरेक्टीन ०.००३ टक्के ( ३००पीपीएम) ५ मिलिदुसरी फवारणी : पीक ५० टक्के फुलोºयावर असताना एचएएनपीव्ही (५०० एलई) १ मिलि किंवा बॅसीलस थुरीन्जीएन्सीस २ ग्रॅमतिसरी फवारणी : दुसºया फवारणीनंतर १५ दिवसांनी इंडोक्झाकार्ब (१४.५ टक्के प्रवाही) किंंवा क्लोरअ‍ॅन्ट्रानिलीप्रोल ( १८.५ टक्के प्रवाही) ०.२५ मिलि